आपल्याला काय संपादन करायचे आहे?

 

असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही?

आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण केवळ द्वेष आणि स्व-संतुष्टताच संपादन केली आहे.

आपल्याला ‘ज्ञान‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त त्रुटी, बोध आणि आकलन या गोष्टीच संपादन केल्या आहेत.

आपल्याला ‘परमानंद‌’ संपादन करायचा आहे, कारण आजवर आपण फक्त सुख व दुःख आणि तटस्थता याच गोष्टी मिळविल्या आहेत.

आपल्याला ‘शक्ती‌’ संपादन करायची आहे, कारण आजवर आपण फक्त दुर्बलता, श्रम आणि पराभूत विजय (विजय मिळालेला असूनसुद्धा पराभूत स्थिती) संपादन केले आहेत.

आपल्याला ‘जीवन‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त जन्म, वाढ आणि मृत्यू एवढेच साध्य केले आहे.

आपल्याला ‘ऐक्य‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त सहयोग आणि युद्ध एवढेच साध्य केले आहे.

एका शब्दात सांगायचे झाले तर, आपल्याला ‘दिव्यत्व‌’ संपादन करायचे आहे, दिव्य प्रतिमेमध्ये आपल्या स्वतःला घडवायचे आहे.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200-201)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

 

श्रीअरविंद