मनुष्यामध्ये असणारी ईश्वरी उपस्थिती हे प्रत्येक व्यक्तीचे सत्य असते, तो व्यक्तीचा आंतरिक धर्म (inner law) असतो. आणि हा आंतरिक धर्मच तिच्या जीवनाचा स्वामी आणि मार्गदर्शक असला पाहिजे. तुम्ही जेव्हा या आंतरिक धर्माचे म्हणणे शिरसावंद्य मानण्याची सवय लावून घेता, जेव्हा तुम्ही त्याचे पालन करता, जेव्हा तुम्ही त्याचे अनुसरण करता, त्या धर्माने तुमच्या जीवनाला मार्गदर्शन करावे असा अधिकाधिक प्रयत्न तुम्ही करता, तेव्हा तुम्ही स्वतःभोवती सत्य, शांती, सुसंवाद यांचे एक वातावरण निर्माण करता. आणि साहजिकपणे त्याचा परिणाम वस्तुमात्रांवर, परिस्थितीवर होतो. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात वावरता त्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो. जेव्हा तुम्ही न्याय, सत्य, सुसंवाद, करुणा, समजूतदारपणा, परिपूर्ण सदिच्छा यांची जणू मूर्तीच असता तेव्हा, ही आंतरिक वृत्ती, जितकी जास्त प्रामाणिक आणि समग्र असेल तेवढ्या प्रमाणात तिचा बाह्य परिस्थितीवर परिणाम होतो. म्हणजे त्यामुळे जीवनातील अडचणी नाहीशा होतात असे नाही, पण त्या आंतरिक वृत्तीमुळे, या अडीअडचणींना एक नवीन अर्थ प्राप्त होतो आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक नवे सामर्थ्य लाभते, एक नवीन शहाणीव (wisdom) प्राप्त होते. (उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 03 : 278-279)
(दि. १९.०६.१९०९) जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे…
दि. १९.०६.१९०९ प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला…
(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी भारताविषयी आणि त्याच्या जीवितकार्याविषयी वेळोवेळी जे उद्गार काढले होते ते आता…
(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन...) हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते,…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…