ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मनुष्यामध्ये असणारी ईश्वरी उपस्थिती हे प्रत्येक व्यक्तीचे सत्य असते, तो व्यक्तीचा आंतरिक धर्म (inner law) असतो. आणि हा आंतरिक धर्मच तिच्या जीवनाचा स्वामी आणि मार्गदर्शक असला पाहिजे. तुम्ही जेव्हा या आंतरिक धर्माचे म्हणणे शिरसावंद्य मानण्याची सवय लावून घेता, जेव्हा तुम्ही त्याचे पालन करता, जेव्हा तुम्ही त्याचे अनुसरण करता, त्या धर्माने तुमच्या जीवनाला मार्गदर्शन करावे असा अधिकाधिक प्रयत्न तुम्ही करता, तेव्हा तुम्ही स्वतःभोवती सत्य, शांती, सुसंवाद यांचे एक वातावरण निर्माण करता. आणि साहजिकपणे त्याचा परिणाम वस्तुमात्रांवर, परिस्थितीवर होतो. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात वावरता त्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो. जेव्हा तुम्ही न्याय, सत्य, सुसंवाद, करुणा, समजूतदारपणा, परिपूर्ण सदिच्छा यांची जणू मूर्तीच असता तेव्हा, ही आंतरिक वृत्ती, जितकी जास्त प्रामाणिक आणि समग्र असेल तेवढ्या प्रमाणात तिचा बाह्य परिस्थितीवर परिणाम होतो. म्हणजे त्यामुळे जीवनातील अडचणी नाहीशा होतात असे नाही, पण त्या आंतरिक वृत्तीमुळे, या अडीअडचणींना एक नवीन अर्थ प्राप्त होतो आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक नवे सामर्थ्य लाभते, एक नवीन शहाणीव (wisdom) प्राप्त होते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 278-279)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद

(आपल्या चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद याची आपल्याला जाणीव नसते याविषयी श्रीमाताजींनी काही सांगितले…

2 days ago

अडचण दूर करण्याचा उपाय

(तुमच्यामध्ये काही बदल घडवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नेमके काय केले पाहिजे हे श्रीमाताजींनी…

3 days ago

खरी समस्या

तुमच्या सचेत अस्तित्वामधील (conscious being) कोणत्या तरी एखाद्या घटकाला तुमच्यामधीलच अमुक एक अडचण (वाईट सवय,…

4 days ago

दृढ निश्चयातून बदल

  (बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी…

5 days ago

बदलास नाखूष असणारा घटक

(स्वत:मध्ये बदल व्हावा असे व्यक्तीला वाटत असले तरी तो बदल का होत नाही याचे कारण…

6 days ago

अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर

  साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते? श्रीमाताजी : सोपे…

7 days ago