मानसिक प्रशिक्षण
साधना, योग आणि रूपांतरण – २५१
मानसिक रूपांतरण
वाचन, विविध गोष्टींविषयी जाणून घेणे, संपूर्ण आणि अचूक माहिती मिळविणे, तर्कशुद्ध विचार करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देणे, एखाद्या समस्येच्या सर्व बाजू अनाग्रही पद्धतीने विचारात घेणे, घाईघाईने काढलेल्या किंवा चुकीच्या अनुमानांना वा निष्कर्षांना नकार देणे, सर्व गोष्टींकडे स्पष्टपणे व समग्रपणे पाहायला शिकणे या सर्व गोष्टींचा समावेश ‘मानसिक प्रशिक्षणा’मध्ये होतो.
*
एखाद्या व्यक्तीने पुष्कळ वाचन केलेले असूनही, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या मात्र अविकसित असू शकते. विचार केल्याने, जाणून घेतल्याने, बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असणाऱ्यांचे मानसिक प्रभाव ग्रहण केल्याने व्यक्तीचे मन विकसित होत जाते.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 69, 70)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- भारताची एकात्मता का आवश्यक? - October 10, 2026
- देशाची फाळणी आणि भारताचे भवितव्य - October 9, 2026
- श्रीअरविंद याच्या दिव्य दृष्टीसमोरील पाच ध्येयं - October 8, 2026





