ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

समग्र आणि परिपूर्ण साक्षात्कार

आध्यात्मिकता २५

आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक चेतना तुम्हाला सखोल आंतरिक साक्षात्कार प्रदान करते, ती तुमचा ‘ईश्वरा’शी संपर्क करून देते, बाह्य बंधनांपासून मुक्ती देते; परंतु ही मुक्ती परिणामकारक व्हायची असेल तर, आणि या मुक्तीचा जिवाच्या इतर घटकांवरदेखील परिणाम व्हायला हवा असेल तर, ‘ज्ञाना’चा आध्यात्मिक प्रकाश धारण करण्याइतपत मन पुरेसे खुले झाले पाहिजे; दृश्य रूपांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींना हाताळण्याइतपत आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याइतपत प्राण सशक्त झाला पाहिजे; हा सखोल अनुभव दैनंदिन जीवन-व्यवहारांमध्ये आणि प्रत्येक क्षणी अभिव्यक्त करणे शक्य व्हावे आणि समग्रतया तो अनुभव जगता यावा यासाठी शरीराला शिस्त लावली पाहिजे, त्याची नीट व्यवस्था लावली पाहिजे.

…आपल्याला जीव म्हणून जर समग्र, पूर्ण बनायचे असेल, पूर्ण साक्षात्कार व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर, आलेला आध्यात्मिक अनुभव आपल्याला मनाद्वारे, प्राणाद्वारे आणि शरीराद्वारे अभिव्यक्त करता आला पाहिजे. आणि आपली अभिव्यक्ती जितकी जास्त निर्दोष असेल, आणि ती एका समग्र आणि परिपूर्ण जिवाकडून कार्यवाहीत झाली असेल, तर आपला साक्षात्कार हा अधिक समग्र आणि परिपूर्ण असेल.

– श्रीमाताजी [CWM 09 : 345-346]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

जगाचा आध्यात्मिक गुरू

  दि. ०८ जून १९६७ साधक : मी असे ऐकले होते की, १९६७ साली भारत…

6 days ago

जीवनाचे रूपांतरण हे उद्दिष्ट

  दि. ३१ मार्च १९६७ श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित…

1 week ago

सत्याचा मार्ग

  दि. ०७ सप्टेंबर १९६६ साधक : पृथ्वीतलावर आध्यात्मिक जीवनाची प्रतिष्ठापना करण्यासाठी भारताने जगाचे गुरू…

1 week ago

आध्यात्मिक मार्गदर्शक

  दि. १३ ऑक्टोबर १९६५ साधक : एकंदरीत पाहिले तर सर्वसाधारणपणे सद्यस्थितीत जग हे एक…

1 week ago

भारत – या सम हा

  दि. २९ सप्टेंबर १९६५ (श्रीअरविंद यांनी दि. ०४ एप्रिल १९५० रोजी लिहिलेल्या पत्रामधील एक…

1 week ago

भारताच्या अस्तित्वाचे सत्य

  दि. १६ सप्टेंबर १९६५ (भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना श्रीमाताजींनी दिलेला संदेश)…

2 weeks ago