समर्पण – ०३
ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा कोणताही आग्रह न धरता, त्या साऱ्यांची जागा ‘ईश्वरी सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे सर्वत्र घेता यावी म्हणून, त्याला सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण!
– श्रीअरविंद
(CWSA 29: 67)
फेब्रुवारी १९५४ भारताचे आणि जगाचे संरक्षण करण्यासाठी सामंजस्यपूर्ण इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान यांच्या आधारे घडण…
ऑक्टोबर १९४८ प्रामाणिक, धैर्यवान, सहिष्णू आणि सत्त्वनिष्ठ राहून तुम्ही तुमच्या देशाची सर्वोत्तम सेवा करू…
दि.०३.०६.१९४७ (भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबेटन यांनी ०२ जून १९४७ रोजी रेडिओवरून एक भाषण…
(सन १९१८) सध्याचा काळ असा आहे की जेव्हा, अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती…
(सन १९१०) खरी अडचण ही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नसते; तर ती नेहमी आपल्यामध्येच असते. व्यक्तीला…