जे स्वत:च्या सामान्य प्रकृतीवर मात करण्यासाठी धडपडतात; दिव्य सत्याच्या संपर्कात येण्याचा जो खोलवरचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, तो जडभौतिकामध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी, जे प्रयत्नशील असतात; जे अतीत किंवा सर्वोच्चाप्रत निघून जाण्याऐवजी, स्वत:च्या अंतरंगात अनुभवास आलेले जाणिवेतील परिवर्तन भौतिकरित्या, बाह्यात उतरविण्यासाठीसुद्धा धडपडतात; ते सर्व अतिमानवतेचे उमेदवार असतात. आणि त्यांच्या या प्रयत्नांच्या यशस्वितेमध्ये अनेकानेक प्रकार आहेत.
ज्या ज्या वेळी आपण सामान्य माणूस म्हणून बनून राहण्याचे नाकारतो, सामान्य जीवन जगणे नाकारण्याचा प्रयत्न करतो; ज्या ज्या वेळी आपल्या हालचालींमधून, कृतींमधून, प्रतिक्रियांमधून आपण ते दिव्य सत्यच अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो; जेव्हा सार्वत्रिक अज्ञानाची सत्ता आपल्यावर चालू न देता, दिव्य सत्याने आपण शासित होतो, त्या वेळी आपण अतिमानवतेचे प्रशिक्षणार्थी असतो. आणि आपल्या प्रयत्नांच्या यशस्वितेनुसार, आपण कमी अधिक प्रमाणात सक्षम प्रशिक्षणार्थी असतो, कमी अधिक प्रमाणात या मार्गावर प्रगत झालेले असतो.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 410)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…