Tag Archive for: स्वार्थांधता

 

दि. २५ एप्रिल १९५४

श्रीअरविंदांचे आपल्या मातृभूमीवर नेहमीच अगाध प्रेम होते. भारतभूमी महान, उदात्त, विशुद्ध राहावी आणि जगातील तिच्या महान जीवितकार्यासाठी सुपात्र ठरावी अशी त्यांची इच्छा होती. भारतभूमी ही, स्वार्थांधता आणि अज्ञानी पूर्वग्रह यामुळे घृणास्पद व हीन दशेस जाऊ नये म्हणून ते प्रयत्नशील राहिले. आणि म्हणूनच, अज्ञान, मूढता, सूडबुद्धी किंवा दुरिच्छा यांच्या आहारी जाऊन, जे तिला धुळीस मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची पर्वा न करता, आम्ही श्रीअरविंदांच्या इच्छेशी प्रामाणिक राहून, मानवाचे रूपांतरण, प्रगती आणि सत्य यांचा मानदंड उंचावण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही तो मानदंड अगदी उंच धरला आहे म्हणजे ज्या कोणापाशी मातृभूमीसाठी धडधडणारे हृदय आहे ते तो मानदंड पाहू शकतील आणि त्याच्याभोवती संघटित होऊ शकतील.

– श्रीमाताजी (CWM 13 : 123)