१९५५
साधक : भारताचे भारतीयांपासून रक्षण करावे म्हणून मी आपणास प्रार्थना करत आहे.
श्रीमाताजी : हो, ते आवश्यक आहे, असे दिसते.
*
दि. १५ नोव्हेंबर १९५५
(भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी श्रीअरविंद आश्रमाला भेट दिली होती. तेव्हा श्रीमाताजींनी दिलेला संदेश…)
भारताचे जे जीवितकार्य आहे त्या उंचीप्रत त्याने उन्नत झालेच पाहिजे आणि त्याने जगामध्ये सत्याची उद्घोषणा केली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 13 : 354)






