दि. ०६ मार्च १९६२
साधक : कुरुक्षेत्राच्या महायुद्धाला पाच हजार वर्षं होऊन गेली परंतु श्रीकृष्णाच्या राजनैतिक प्रतिभेचा सौम्य प्रभाव कालपरवाच झांशीची राणी लक्ष्मीबाईच्या अंताबरोबर संपुष्टात आला, असे श्रीअरविंदांनी म्हटले आहे. त्यानंतर, भारताचे आणि नवीन जगताचे संरक्षण करण्यासाठी, आता पूर्णावतार होण्याचीच आवश्यकता आहे. आत्ता सुप्तावस्थेत असलेले ब्राह्मतेज हा अवतार जागृत करेल. श्रीअरविंदांनी असेही म्हटले आहे की, या कलियुगामध्येच ईश्वर पूर्णत्वाने आविष्कृत होणार आहे; कारण या युगामध्ये मनुष्य हा अतिशय बिकट संकटामध्ये सापडला आहे. तो अवतार इथेच आहे. त्यांनी स्वतःच हे महान सत्य उघड केले आहे की, ईश्वर भारतामध्ये पूर्णपणे आविष्कृत झाला आहे. परंतु हे आविष्करण म्हणजे ते स्वतःच आहेत, हे मात्र ते विनम्रतेमुळे सांगत नाहीत.
श्रीमाताजी : जे कार्यसिद्धी करतात त्यांना बढाया मारण्याची सवय नसते. ते त्यांची शक्ती कार्यासाठी राखून ठेवतात आणि कार्यफलाचे वैभव ‘शाश्वत ईश्वरा’वर सोपवितात.
– श्रीमाताजी (CWM 16 : 269-270)





