देशभक्तीची भावना आणि योगसाधना

दि. २७ ऑक्टोबर १९६२

देशभक्तीची भावना ही आपल्या योगाशी मिळतीजुळती नाही, असे नाही; उलट, आपल्या मातृभूमीच्या अखंडतेची आणि तिच्या शक्तिसामर्थ्याची आस बाळगणे ही पूर्णपणे न्याय्य भावना आहे. मातृभूमीने प्रगती करावी; मातृभूमीने तिच्या अस्तित्वाचे सत्य, संपूर्ण स्वतंत्रपणे अधिकाधिक आविष्कृत करावे अशी इच्छा बाळगणे ही चांगली व उदात्त इच्छा आहे आणि ती आपल्या योगासाठी हानिकारक असू शकत नाही.

परंतु व्यक्तीने उतावीळ होऊ नये आणि अपरिपक्वपणे घाईघाईने कृती करायला सरसावू नये. व्यक्ती प्रार्थना करू शकते आणि तिने तशी ती करावी. अभीप्सा बाळगावी, सत्याच्या विजयाची आस बाळगावी आणि त्याबरोबरच, स्वत:ची दैनंदिन कर्तव्यं पार पाडणे चालू ठेवावे आणि करायच्या कृतीचा सुस्पष्ट संकेत मिळण्याची शांतपणे प्रतीक्षा करावी.

– श्रीमाताजी (CWM 13 : 356)

श्रीमाताजी