चैत्य पुरुषाचा शोध
‘सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि फक्त ईश्वराप्रति अभिमुख होण्याची इच्छा या गोष्टी म्हणजे चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी आणण्याची सर्वोत्तम साधने आहेत,’ हे श्रीअरविंदांचे वचन लक्षात घ्या.
जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि इतर कोणतीही व्यवधाने नसतील अशी दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करा. शांतपणे बसा आणि चैत्य पुरुषाच्या संपर्कात येण्याची तळमळ, अभीप्सा (aspiration) उरी बाळगून चैत्य पुरुषाचा ध्यास घ्या. त्यामध्ये तुम्हाला लगेच यश आले नाही तरी नाउमेद होऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश मिळेलच, याची खात्री बाळगा.
– श्रीमाताजी (CWM 17 : 363)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- देशभक्तीची भावना आणि योगसाधना - November 6, 2026
- पूर्णावतार श्रीअरविंद - November 5, 2026
- भारताचे उज्ज्वल भवितव्य - November 4, 2026





