आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धिकरण करणारे कर्म
साधनेची मुळाक्षरे – १८
कोणत्याही वैयक्तिक प्रेरणांशिवाय, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना जे कर्म केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता केले जाते; जे केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’ साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धिकरण करणारे असते. सर्व कर्मं जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 232)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- एक महान निर्णायक वळण - October 25, 2026
- आपल्या मोक्षाची पूर्वअट - October 24, 2026
- भारत-माता - October 23, 2026







