Entries by श्रीमाताजी

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला हव्याहव्याशा वाटायच्या त्यातील तुमचे स्वारस्य नाहीसे होते. परंतु हे चेतनेमधील ‘परिवर्तन’ असते; आम्ही ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो ते हे नव्हे. कारण रूपांतरण हे मूलभूत आणि परिपूर्ण असते, तो काही केवळ बदल नसतो अथवा परिवर्तन नसते, तर ते चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal) असते. […]

साधना, योग आणि रूपांतरण – २२०

साधना, योग आणि रूपांतरण – २२० आपल्याला संपूर्ण रूपांतरण अपेक्षित आहे, म्हणजे शरीर आणि त्याच्या सर्व कृती यांचे रूपांतरण आपल्याला अपेक्षित आहे. परंतु अन्य कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी, पहिली पायरी अगदी अनिवार्य असते आणि ती म्हणजे चेतनेचे रूपांतरण. या रूपांतरणासाठी अभीप्सा असणे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प असणे हा अर्थातच आरंभबिंदू आहे, त्याशिवाय काहीच होणे शक्य […]

साधना, योग आणि रूपांतरण – १५४

साधना, योग आणि रूपांतरण – १५४ पूर्णयोगांतर्गत भक्ती साधक : श्रीअरविंदांनी असे सांगितले आहे की, व्यक्ती मानवी प्रेमाकडून दिव्य प्रेमाकडे वळू शकते. श्रीमाताजी : जे मानवी प्रेम ‘भक्ती’ म्हणून, ‘ईश्वर’विषयक भक्तीची ‘शक्ती’ म्हणून आविष्कृत होते त्या प्रेमाविषयी श्रीअरविंद सांगत होते. ते म्हणतात, सुरुवातीला ईश्वराबद्दलचे प्रेम हे अगदी मानवी स्तरावरील प्रेम असते, आणि त्यामध्ये मानवी प्रेमाची […]

साधना, योग आणि रूपांतरण – १५२

साधना, योग आणि रूपांतरण – १५२ पूर्णयोगांतर्गत भक्ती ‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘ईश्वराची उपस्थिती’ जाणवेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. या दोन […]

कर्म करताना कर्मरूप होणे – ०२

साधना, योग आणि रूपांतरण – ११८ (पूर्वार्ध – “कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही”, असे श्रीमाताजींनी सांगितले.) उत्तरार्ध – तुम्ही (कर्मरूप न […]

कर्म करताना कर्मरूप होणे – ०१

साधना, योग आणि रूपांतरण – ११७ (कर्म हे साधनेचा भाग कसा होऊ शकते हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.) व्यक्तीने कर्मामध्ये अधिकाधिक गढून जाण्याचा आणि परिणामतः स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कर्म आपण ‘ईश्वरा’ला अर्पण करत आहोत या भावनेने केले पाहिजे; अगदी निरलसपणे, विपुल प्रमाणात, स्वत:ला पूर्णपणे विसरून, स्वत:मधील सर्व काही देऊ करण्याच्या भावनेने केले […]

पूर्णयोगाचे ध्येय

साधना, योग आणि रूपांतरण – ९४ अतिमानसामध्ये ‘ईश्वरा’शी जाणीवपूर्वक, सचेत रितीने एकत्व पावणे आणि प्रकृतीचे रूपांतरण करणे हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. सर्वसाधारण योगमार्ग ‘मना’कडून वैश्विक ‘नीरवते’च्या एखाद्या अलक्षण (featureless) स्थितीमध्ये थेट निघून जातात आणि त्याच्या माध्यमातून ऊर्ध्वमुख होत, ते ‘सर्वोच्च’ स्थितीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या अतीत होणे आणि ‘सच्चिदानंदा’च्या ‘दिव्य सत्या’मध्ये, म्हणजे जे केवळ […]

अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन

साधना, योग आणि रूपांतरण – ९३ “व्यक्तीने नेहमी तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे.” म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, तुम्हाला आलेल्या अनुभवाचे स्वरूप कोणतेही असले, त्याचे सामर्थ्य किंवा त्याची अद्भुतता कितीही असली तरी, त्या अनुभवाचा तुमच्यावर वरचष्मा असता कामा नये. म्हणजे त्यामुळे तुमचा तोल ढळता कामा नये आणि तुमच्या योग्य आणि स्थिरशांत दृष्टिकोनाबरोबर असलेला […]

समाधी ही प्रगतीची खूण?

साधना, योग आणि रूपांतरण – ९२ साधक : समाधी-अवस्था ही प्रगतीची खूण आहे का? श्रीमाताजी : ही अतिशय उच्च अवस्था आहे असे प्राचीन काळी मानले जात असे. एवढेच नव्हे तर, ती महान साक्षात्काराची खूण आहे, असे समजले जात असे. आणि त्यामुळे जे कोणी योगसाधना करू इच्छित असत ते नेहमीच या अवस्थेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत […]

रूपांतरणासाठी आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य

साधना, योग आणि रूपांतरण – ७९ साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ? श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची […]