Entries by श्रीमाताजी

अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन

साधना, योग आणि रूपांतरण – ९३ “व्यक्तीने नेहमी तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे.” म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, तुम्हाला आलेल्या अनुभवाचे स्वरूप कोणतेही असले, त्याचे सामर्थ्य किंवा त्याची अद्भुतता कितीही असली तरी, त्या अनुभवाचा तुमच्यावर वरचष्मा असता कामा नये. म्हणजे त्यामुळे तुमचा तोल ढळता कामा नये आणि तुमच्या योग्य आणि स्थिरशांत दृष्टिकोनाबरोबर असलेला […]

समाधी ही प्रगतीची खूण?

साधना, योग आणि रूपांतरण – ९२ साधक : समाधी-अवस्था ही प्रगतीची खूण आहे का? श्रीमाताजी : ही अतिशय उच्च अवस्था आहे असे प्राचीन काळी मानले जात असे. एवढेच नव्हे तर, ती महान साक्षात्काराची खूण आहे, असे समजले जात असे. आणि त्यामुळे जे कोणी योगसाधना करू इच्छित असत ते नेहमीच या अवस्थेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत […]

रूपांतरणासाठी आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य

साधना, योग आणि रूपांतरण – ७९ साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ? श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची […]

अंतरंगात असणारा दरवाजा

साधना, योग आणि रूपांतरण – ७२ (श्रीमाताजी साधकांना उद्देशून…) तुमच्या सर्वांच्या अंतरंगात असणारा दरवाजा उघडण्यासाठी मी खूप काळजी घेते. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये एकाग्रतेची थोडीशी जरी कृती केलीत तर, तुम्हाला न उघडणाऱ्या बंद दरवाजासमोर दीर्घ काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्याकडे त्याची किल्लीही नसते आणि तिचा उपयोग करून तो दरवाजा कसा उघडायचा हेही तुम्हाला […]

आघात नव्हे, आशीर्वाद

साधना, योग आणि रूपांतरण – ५८ जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि (असे असेल तरच) तुम्हाला ध्यान करणे शक्य होईल असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता […]

ध्यानातील अडचण

साधना, योग आणि रूपांतरण – ५४ (आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आजवर ध्यान म्हणजे काय, ध्यान आणि एकाग्रता यांमध्ये काय फरक आहे, हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे समजावून घेतले. ध्यान कसे करायचे या बाबतीतले अनेक बारकावेदेखील समजावून घेतले. श्रीअरविंद आणि श्रीमाताजींना, साधकांनी ध्यानात येणाऱ्या अडचणींविषयी वेळोवेळी विचारले आहे आणि त्यांनी त्यांची […]

ईश्वराच्या उपस्थितीचा अनुभव

साधना, योग आणि रूपांतरण – ५२ आंतरिक आधार शोधण्यासाठी तुम्ही, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत विशाल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; तुम्ही आत, अधिक आत, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अविचल, प्रसन्न शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव […]

ध्यानासाठी दिलेला वेळ

साधना, योग आणि रूपांतरण – ५० साधक : मी सध्या ध्यानासाठी जेवढा वेळ देतो त्यापेक्षा अधिक वेळ देणे माझ्यासाठी योग्य ठरेल का, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी मिळून मी सुमारे दोन तास ध्यानामध्ये व्यतीत करतो. मात्र अजूनही मी ध्यान करण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही. माझे शारीर-मन त्यामध्ये खूप व्यत्यय आणते.. ते शांत […]

एकाग्रता म्हणजे काय?

साधना, योग आणि रूपांतरण – ४८ साधक : मी तुमच्या पुस्तकात असे वाचले आहे की, “एकाग्रता हीच व्यक्तीला तिच्या ध्येयाप्रत घेऊन जाते.” असे असेल तर मग आम्ही ध्यानाचा कालावधी वाढविला पाहिजे का? श्रीमाताजी : येथे एकाग्रतेचा अर्थ ‘ध्यान’ असा नाही. उलट, बाह्यतः तुम्ही कोणतेही कार्य करत असलात तरी तुम्ही कायम एकाग्रतेच्या स्थितीमध्ये असले पाहिजे. आपल्या […]

ध्यान आणि ईश्वरी प्रतिसाद

साधना, योग आणि रूपांतरण – ४४ तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुमच्या बाह्यवर्ती मनाची लुडबूड त्यामध्ये असता कामा नये. कशाची अपेक्षा नाही किंवा कशाचा आग्रहही नाही, असे तुम्ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे साधेसरळ आणि मनमोकळे असले पाहिजे. एकदा अशी अवस्था प्राप्त झाल्यावर, मग उर्वरित सारेकाही तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या अभीप्सेवर अवलंबून असते. आणि तुम्ही जर ‘ईश्वरा’ला साद […]