Entries by श्रीमाताजी

सर्वसमावेशक नियम

संवादक : “कोणतेही नियम वा कायदे केले जाणार नाहीत. जसेजसे ऑरोविलचे गर्भित सत्य उदयास येत जाईल आणि ते हळूहळू आकार घेऊ लागेल, तसतशा गोष्टी नियमबद्ध होत जातील. आम्ही आधीपासूनच कशाचीही अटकळ बांधत नाही.” श्रीमाताजी : मला असे म्हणायचे आहे की, सर्वसाधारणपणे – आत्तापर्यंत तरी आणि आता तर अधिकाधिकपणे – माणसं त्यांच्या त्यांच्या संकल्पनांनुसार, त्यांच्या त्यांच्या […]

आंतरिक कर्म

संवादक : “ऑरोविलमधील रहिवासी तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील.” श्रीमाताजी : तेथील रहिवासी त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार आणि त्यांच्याकडील साधनांनुसार, तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील. तो सहभाग यंत्रवत् नसावा तर जिवंत आणि खराखुरा असावयास हवा. तो प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असेल : म्हणजे, ज्यांच्याकडे भौतिक साधने आहेत, उदा. ज्याच्याकडे कारखान्यात निर्माण होणारे उत्पादन असेल […]

सामूहिक ऐक्य

तुम्ही बिनीचे शिलेदार आहात, तुम्हाला देण्यात आलेले कार्य सर्वाधिक कठीण आहे, पण मला वाटते हे कार्य सर्वात जास्त रोचक, आव्हानात्मक आहे. कारण ठोस, भरीव, टिकावू, विकसित होत जाणाऱ्या मार्गाच्या साहाय्याने, एक सच्चा ऑरोविलवासी बनण्यासाठी आवश्यक असणारी वृत्ती तुमची तुम्हालाच प्रस्थापित करावयाची आहे. खराखुरा ऑरोविलवासी होण्यासाठी आवश्यक असा एक धडा रोजच्या रोज शिकणे, दररोज त्या त्या […]

ऑरोविलचे सामूहिक उद्दिष्ट

व्यवहारात वागत असताना, तुमच्या उद्दिष्टाची तुम्हाला सुस्पष्ट कल्पना हवी. तुम्ही कुठे जात आहात, तुमचे गंतव्य काय आहे ह्याचे स्पष्ट ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून धनाचे उदाहरण घ्या. काळाच्या दृष्टीने पाहता, कित्येक शतके पुढचा असा एक आदर्श पाहा : धन ही अशी एक शक्ती असावी की, जिच्यावर कोणाचीच मालकी नसावी व ती त्या काळी उपलब्ध […]

समष्टीचे पूर्णत्व

ज्यांना कोणाला ऑरोविलमध्ये राहावयाचे आहे आणि कार्य करावयाचे आहे त्यांच्याकडे – पूर्ण शुभसंकल्प असणे आणि सत्य जाणून घेण्याची व त्याला शरणागत होण्याची सातत्यपूर्ण अभीप्सा असणे आवश्यक आहे. कार्यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी लागणारी पुरेशी लवचीकता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे, तसेच परमसत्याच्या दिशेने वाटचाल होत राहावी यासाठी लागणारी प्रगतीची असीम अशी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. […]

जीवनप्रणालीच्या अभ्यासाची व संशोधनाची नगरी

श्रीमाताजी : ऑरोविलवासीयांनी अन्नासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, पण त्यांनी त्याबदल्यात काही काम केले पाहिजे किंवा ते ज्याचे उत्पादन करतात ते त्यांनी देऊ केले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी त्यांच्या शेतातील पीक दिले पाहिजे; ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी त्यांच्या कारखान्यांमधील उत्पादने दिली पाहिजेत; कोणी अन्नाच्या मोबदल्यात श्रमदान केले पाहिजे. आणि त्यातूनच बऱ्याच अंशी […]

सच्च्या ऑरोविलवासीयाची वैशिष्ट्ये

१. आपल्या सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, वंशीय आणि आनुवंशिक बाह्यरूपाच्या पाठीमागील आपले खरे अस्तित्व काय हे जाणून घेण्यासाठी आंतरिक शोध घेणे ही पहिली आवश्यकता आहे. केंद्रस्थानी मुक्त, विशाल आणि जाणते असे अस्तित्व विद्यमान असते व आपण त्याचा शोध घ्यावा याची ते वाट बघत असते. ते आपल्या जीवाचे, अस्तित्वाचे व ऑरोविलमधील आपल्या जीवनाचे सक्रिय केंद्र बनले पाहिजे. […]

सच्चा ऑरोविलवासी बनणे

श्रीमाताजी : सच्चा ऑरोविलवासी होण्यासाठी व्यक्तीने कसे असले पाहिजे ? असाच प्रश्न विचारला आहेस ना तू ? (‘अ’ला उद्देशून) त्याविषयी तुझ्या काही कल्पना आहेत का? अ : खऱ्या अर्थाने ऑरोविलवासी (Aurovilian) होण्यासाठी माझ्या कल्पनेप्रमाणे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे – भगवंताला पूर्णपणे आत्मार्पण करण्याचा दृढसंकल्प असणे. श्रीमाताजी : छान, चांगलेच आहे; पण असे लोक […]

ऑरोविलवासी होणे

ऑरोविलवासी होण्यासाठीच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पुढील अटी आवश्यक आहेत. मानवजातीच्या अनिवार्य अशा एकतेविषयी खात्री पटलेली असणे आणि ती एकता भौतिकामध्ये प्रत्यक्षात उतरावी म्हणून सहकार्य करावयाची इच्छा असणे. भावी काळात प्रत्यक्षात उतरणाऱ्या शक्यतांना चालना देणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये सहयोगी होण्याचा संकल्प बाळगणे. जसजसे हे कार्य प्रत्यक्षात येईल, प्रगत होईल तसतशी भौतिक परिस्थितीची आखणी केली जाईल. * भविष्याच्या दिशेने […]

आपल्या अस्तित्वाचे खरे प्रयोजन

आपण इथे आहोत ते सर्व इच्छा-वासनांना टाकून देत भगवंताकडे वळण्यासाठी आणि ईश्वराविषयी जागरूक होण्यासाठी! ज्या ईश्वराच्या प्राप्तीची आपण इच्छा करतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. तो आपल्या स्वत:च्या सृष्ट विश्वाच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा आहे ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साह्याने ‘त्याला’ जाणण्यास, ‘त्याच्या’शी […]