Entries by श्रीमाताजी

ईश्वरोन्मुखता

एकत्व – ०३ संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे, वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा. तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ईश्वराचे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या […]

व्यक्तिगत प्रगती आणि सामाजिक उत्थान

एकत्व – ०२   आपण जर एखाद्या धार्मिक संघटनेचे उदाहरण घेतले – तर त्या संघाचे प्रतीक म्हणजे मठासारख्या वास्तुरचना, एकसमान पोषाख, एकसमान उपक्रम, एकसमान हालचालीसुद्धा असतात. मी अधिक स्पष्ट करून सांगते. प्रत्येकजण एकसारखाच गणवेश परिधान करेल, प्रत्येक जण सकाळी ठरावीक वेळीच उठेल, एकसारख्याच प्रकारचे अन्नग्रहण करेल, एकत्रितपणे येऊन समानच प्रार्थना करतील इ. ह्याला एक सर्वसाधारण […]

पृथ्वीविषयक कार्याची भावी दिशा – व्यक्तिगत आणि सामूहिक कार्य

एकत्व ०१ आत्ताच्या घडीला करायलाच हवे असे सर्वांत उपयुक्त कार्य कोणते? ‘क्रमवार विकसित होणाऱ्या वैश्विक सुसंवादित्वाचे आगमन’ ही गोष्ट साध्य करणे, हे सर्वसाधारण ध्येय असले पाहिजे. पृथ्वीच्या संदर्भात, हे साध्य प्राप्त करून घेण्याचे साधन म्हणजे जे ‘एकम्’ आहे अशा आंतरिक दिव्यत्वाचे, सर्वांकडून आविष्करण आणि त्या ‘एकम्’ विषयीच्या जागृतीद्वारे, मानवी एकतेचे प्रत्यक्षीकरण हे होय. आपल्या अंतरंगामध्ये […]

प्रार्थना – ०७

जो सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होतो, त्या ईश्वरा, तुझा जयजयकार असो. आम्हास असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट तुझ्या कार्यात अडसर ठरू नये. आम्हास असे वरदान दे की, कोणत्याही गोष्टीमुळे तुझ्या आविष्करणामध्ये विलंब होणार नाही. आम्हास असे वरदान दे की, प्रत्येक क्षणी, सर्व गोष्टींमध्ये तुझीच इच्छा कार्यरत होईल. तुझ्या मन:संकल्पाची परिपूर्ती आमच्यामध्ये होऊ […]

प्रार्थना – ०५

ज्याला तुझी सेवा करण्यासाठी पात्र बनायचे आहे त्याने कशालाच चिकटून राहता कामा नये, अगदी ज्या कामकाजामुळे त्याला तुझ्याशी अधिकाधिक जाणीवपूर्वकतेने संपर्क साधता येतो अशा कामकाजाची देखील त्याने आसक्ती बाळगता कामा नये. आणि समग्र परिस्थितीचा परिणाम म्हणून, जर त्याच्या जीवनातील बरीचशी जागा ही नेहमीपेक्षाही अधिक भौतिक गोष्टींनी व्यापली जात असेल, तर त्यामध्ये त्याने गुंतून कसे पडू […]

प्रार्थना – ०४

हे ईश्वरा, मला तुझा प्रकाश प्रदान कर. हे प्रभो, माझ्या हातून कधीही चूक घडू नये असे मला वरदान दे. माझ्यामध्ये तुझ्याविषयी जो परम आदर आहे, तुझ्याविषयीची जी परमभक्ती आहे, तुझ्याविषयी माझ्या मनात जे उत्कट आणि गभीर प्रेम आहे ते प्रेम, ती भक्ती, तो आदर दीप्तीमान होत, विश्वास उत्पन्न करणारा होत, सहवासामुळे इतरांमध्येही प्रसृत होत, सर्वांच्या […]

प्रार्थना – ०३

हे ईश्वरा, जरी एखाद्याने नीरव एकांतवासामध्ये, पूर्ण समाधी अवस्था प्राप्त करून घेतली तरी ती अवस्था त्याने स्वत:च्या शरीरापासून स्वत:स विलग करून, शरीराची उपेक्षा करून मिळविलेली असते आणि त्यामुळे ज्या घटकांनी देह बनलेला असतो ते घटक तसेच अशुद्ध, आधीइतकेच अपूर्ण राहून जातात, कारण त्याने त्यांना तसेच सोडून दिलेले असते. आणि गूढवादाची शिकवण चुकीच्या रीतीने आकलन झाल्यामुळे, […]

प्रार्थना – ०२

माझ्या सगळ्या भौतिक जबाबदाऱ्या संपल्या रे संपल्या की, त्याबाबतचे सर्व विचार माझ्या मनातून पार नाहीसे होतात आणि मग मी केवळ आणि समग्रतया तुझ्या विचारांनी व्याप्त होते, तुझ्या सेवेमध्ये निमग्न होते. आणि मग एका गभीर शांतीमध्ये आणि प्रसन्नतेमध्ये, माझी इच्छा तुझ्या इच्छेशी एकरूप करते आणि त्या परिपूर्ण शांतीमध्ये मी तुझे सत्य ऐकते, त्या सत्याची अभिव्यक्ती ऐकते. […]

प्रार्थना – ०१

शांतपणे तेवणाऱ्या एखाद्या ज्योतीप्रमाणे, कोणतीही वेडीवाकडी वळणे न घेता, सरळ वर जाणाऱ्या सुगंधाप्रमाणे, माझे प्रेम सरळ तुझ्याप्रत जात आहे आणि एखाद्या बालकाप्रमाणे, कोणत्याही तार्किकतेविना, किंवा कोणत्याही काळजीविना, मी तुझ्याप्रत असा विश्वास बाळगत आहे की, तुझा मानस प्रत्यक्षात उतरेल, तुझा प्रकाश उजळून येईल, तुझी शांती सर्वत्र प्रसृत होईल. आणि तुझे प्रेम विश्वावर पांघरले जाईल. जेव्हा तुझी […]

धर्म आणि अध्यात्म – ०५

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही, अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या […]