Entries by श्रीमाताजी

मांजराच्या पिल्लाची वृत्ती

समर्पण – ३८ मांजराचे पिलू हे त्याच्या आईला घट्ट धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला घट्ट धरून ठेवलेले असते; त्यामुळे त्याला कोणतीच भीती नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला काहीच करावे लागत नाही. कारण आईने त्याला घट्ट धरावे म्हणून त्याने फक्त ‘मा मा’ असा आकांत केलेला असतो. जर तुम्ही हा समर्पणाचा मार्ग पूर्णत: […]

समर्पण आणि प्रकृतीमधील अवज्ञाकारी भाग

समर्पण – ३५ प्रश्न : समर्पण करण्यासाठी आपल्या प्रकृतीमधील अवज्ञाकारी भागांचे मन कसे वळवायचे? श्रीमाताजी : त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, एखाद्या अजाण बालकाबाबत व्यक्ती जसे करते, त्याप्रमाणे सर्व मार्गांचा अवलंब करा – चित्रं, स्पष्टीकरणं, प्रतीकं यांचा वापर करा. व्यक्तित्वाच्या इतर भागांसोबत सुमेळ आणि ऐक्याची आवश्यकता काय आहे हे त्यांना समजावून सांगा; त्यांना तर्काने पटवून […]

आंतरिक स्वच्छता

समर्पण – ३० श्रीमाताजी : समर्पणाची केवळ सकारात्मक क्रियाच पुरेशी असते असे नाही तर नकाराची नकारात्मक क्रियादेखील तितकीच आवश्यक असते. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये समर्पणाला विरोध करणाऱ्या घटकांना आश्रय दिलेला असतो तोपर्यंत तुम्ही एक स्थिर असे रूपांतरण प्राप्त करून घेऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्यामध्ये तमोमय गोष्टी तशाच कायम ठेवल्यात तर त्या गोष्टी काही […]

इच्छेचे समर्पण

समर्पण – २३ … तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेला उधार देऊन, तुम्ही साक्षात्कार अधिक त्वरेने घडवून आणू शकता. हे सुद्धा निराळ्या रूपातील समर्पणच असते. ज्यामुळे तुम्ही एखाद्या ठोकळ्यासारखे बनाल असे निष्क्रिय समर्पण तुमच्याकडून अपेक्षित नाही तर, तुम्ही तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेच्या स्वाधीन केली पाहिजे. तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. […]

ईश्वरार्पण

समर्पण – १९ ज्या क्षणी तुम्ही स्वतःला असे विचारू लागता की, “ईश्वराला अर्पण या विचाराने मी ही कृती केली का? ईश्वराला अर्पण करत आहोत अशी माझी भावना होती का?” त्या क्षणापासून जीवनातील प्रत्येक बारकावा आणि प्रत्येक कृती, विचारांचे प्रत्येक स्पंदन, अगदी प्रत्येक संवेदना, भावना जिला एरवी फार महत्त्व दिले गेले नसते ती गोष्ट आता निराळीच […]

तपशीलवार समर्पण म्हणजे काय?

समर्पण – १८ तपशीलवार समर्पण म्हणजे जीवनाच्या सर्व अंग-उपांगांचे समर्पण. अगदी लहानात लहान गोष्टींचे तसेच दिसताना अगदी किरकोळ वाटतील अशा गोष्टींचेही समर्पण करणे म्हणजे तपशीलवार समर्पण. तपशीलवार समर्पणाचा अर्थ असा की, सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये ईश्वराचे स्मरण ठेवणे; आपण जे काही करतो, अनुभवतो किंवा विचार करतो, त्या साऱ्या गोष्टी त्या ईश्वराच्या सन्निध जाण्याचा एक मार्ग म्हणून […]

तपशीलवार अर्पण

समर्पण – १७ साधारण अर्पणाकडून तपशीलवार अर्पणाप्रत जाण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी अस्तित्वच तुमचे संचालन करत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ती प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराकरवीच केली जात आहे याची जाणीव बाळगून जगा. तुमच्या सर्व हालचाली, गतिविधी म्हणजे केवळ मानसिक कृती नव्हे तर, प्रत्येक विचार, […]

समर्पण वृत्ती

समर्पण – १६ एकदा का तुम्ही योगमार्ग स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे आणि त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा […]

प्रत्येक पावलागणिक आत्मदान

समर्पण – १५ ईश्वराशी ऐक्य म्हणजे योग आणि योग हा आत्मदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येतो – तुम्ही ईश्वराप्रत जे आत्मदान करता त्याच्या पायावर तो उभा राहतो. प्रारंभी तुम्ही या आत्मदानाची सुरुवात अगदी सरसकट करता, म्हणजे जणू कायमसाठी एकदाच आत्मदान करता; तुम्ही म्हणता, ‘मी ईश्वराचा सेवक आहे, माझे जीवन मी पूर्णतः ईश्वराला दिले आहे, आणि माझे सारे […]

समर्पण – साधनेचे खरे तत्त्व

समर्पण – १२ समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते आणि हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे. जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदान (self-giving) देखील अपूर्ण असते. …समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, […]