निसर्गाचे रहस्य – १५
मला असा एक माणूस माहीत आहे की, ज्याला त्याची चेतना व्यापक करायची होती; तो म्हणाला की, त्याला त्यासाठीचा मार्ग सापडला आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावर जमिनीवर पाठ टेकून आडवे पडायचे आणि चांदण्यांकडे पाहत राहायचे, त्यांच्याशी तादात्म्य पावायचा प्रयत्न करायचा आणि त्या जगड्व्याळ अशा विश्वात खोलखोल दूरवर जायचे. अशा रीतीने ही पृथ्वी, तिच्यावरील छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची […]







