Entries by श्रीमाताजी

अगाध आनंद

स्वत:चा विचार न करता, स्वत:साठी न जगता, स्वतःशी काहीही निगडित न ठेवता; जे परमोच्च सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही. – श्रीमाताजी (CWM 03 : 269)

गुलामीची कारणे

जोवर स्त्रिया स्वत:ला मुक्त करत नाहीत तोवर, कोणताही कायदा त्यांना मुक्त करू शकणार नाही. पुढील गोष्टी स्त्रियांना गुलाम बनवतात – १) पुरुष आणि त्याच्या सामर्थ्याविषयीचे आकर्षण २) सांसारिक जीवन आणि त्याची सुरक्षा यांविषयीची इच्छा ३) मातृत्वाविषयीची आसक्ती पुढील तीन गोष्टींमुळे पुरुष गुलाम होतात – १) स्वामित्वाची भावना आणि सत्ता व प्रभुत्व यांबद्दलची आसक्ती २) स्त्रीबरोबर […]

समर्पण हे समग्र आहे किंवा नाही

समर्पण – ५७ प्रश्न : आपले समर्पण हे समग्र आहे किंवा नाही हे व्यक्तीला कसे समजेल? श्रीमाताजी : मला तरी यात काही अवघड आहे असे वाटत नाही. व्यक्तीने एक छोटासा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. एखादा असे म्हणू शकेल की, “मी ‘ईश्वरा’ला समर्पित झालो आहे, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने ठरवावी अशी माझी इच्छा आहे, […]

समर्पणाचा परिणाम

समर्पण ५६ प्रश्न : ‘ईश्वरा’प्रत समर्पण केल्याचा साधकाने जो निश्चय केलेला असतो त्याचा, त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काही परिणाम झाला आहे, हे दर्शविणारे लक्षण कोणते ? श्रीमाताजी : समर्पणाच्या निश्चयातून काही विशिष्ट असे परिणाम दिसून येतात, असे श्रीअरविंद म्हणतात. पहिला परिणाम म्हणजे कोणताही प्रश्न उपस्थित न करता, अगदी सहजतेने (ईश्वराचे) आज्ञाधारक बनणे आणि दुसरा परिणाम म्हणजे, […]

खरेखुरे समर्पण खूप अवघड

समर्पण – ५२ तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण करायचे ठरविलेले असते, तसा निर्णय तुम्ही घेतलेला असतो. परंतु तुमच्या बाबतीत अचानक, काहीतरी असुखद असे घडते, अनपेक्षित असे घडते आणि तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया ही विरोध करण्याचीच असते. परंतु तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण केलेले असते, तुम्ही एकदाच कायमचे म्हटलेले असते की, “आता माझे जीवन हे ईश्वराचे आहे.” आणि […]

आत्मदान करण्यातील अडथळा

समर्पण – ४९ …(आपल्या व्यक्तित्वामध्ये असे काही घटक असतात, ) त्यांना ईश्वराप्रत संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, त्या ईश्वराची ‘इच्छा’ आणि त्याचे ‘मार्गदर्शन’ यांच्याप्रत स्वतःचे आत्मदान करण्याची त्यांची इच्छा असते; आणि त्याच वेळी, म्हणजे जेव्हा तसा अनुभव येतो – जेव्हा व्यक्ती अगदी प्रामाणिकपणे ईश्वराप्रत आत्मदान करू पाहते तेव्हा, या मार्गावर येणारा हा समान अनुभव आहे, […]

ईश्वरा, जशी ‘तुझी’ इच्छा.

समर्पण – ४८ व्यक्ती जर संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, जर तिने त्या ‘ईश्वरी कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे, अशी त्या व्यक्तीची भावना असेल तर ते त्याहूनही अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र ईश्वरी कृपेने असे का केले अन् […]

पृथगात्मतेची प्रेरणा

समर्पण – ४७ ‘विश्वात्मक’ ईश्वराप्रत असो की ‘विश्वातीत’ ईश्वराप्रत असो, आत्मसमर्पण करण्यातील खरा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या मर्यादांविषयी वाटणारे प्रेम हा होय. हे प्रेम स्वाभाविक असते, कारण अगदी मूळ घडणीपासूनच व्यक्तिपर अस्तित्वामध्ये मर्यादांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती आढळून येते. अन्यथा, पृथगात्मतेची (separateness) जाणीवच असणार नाही – सारे काही एकमेकांमध्ये मिसळल्यासारखे होईल, […]

ईश्वरेच्छा की स्व-इच्छा?

समर्पण – ४३ एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे आणि ठरवली पाहिजे : ती अशी की, खरा ईश्वर जसा आहे तसा तो तुम्हाला हवा आहे की, तो जसा असावा अशी तुमची त्याच्याबद्दलची जी कल्पना आहे, त्याच्याशी मिळताजुळता असणारा असा तो तुम्हाला हवा आहे. ईश्वराला तुम्ही जसे असावयास हवे आहात तसे बनण्याचे आणि तुम्ही जे करणे […]

समर्पणाची परीक्षा

समर्पण – ४२ …आयुष्यात निदान एकदा तरी, आपल्याबाबतीत अशी परिस्थिती येते की जेव्हा ईश्वरी इच्छेप्रत संपूर्ण समर्पण करण्यासाठी आपण तयार आहोत की नाही, याची परीक्षा होते; आपण ईश्वरत्वाच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या आविष्करणासाठी धडपणारे मानव आहोत का याची परीक्षा होते; परमोच्च विजयासाठी जगातील यच्चयावत सर्व गोष्टींचा म्हणजे ज्या आपल्याला खराब वाटतात किंवा ज्या आपल्याला चांगल्या वाटतात […]