Entries by श्रीमाताजी

अमर्त्यत्वाचा शोध १८

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०२ जीवनाचा अंत होत नाही, पण रूपाचे मात्र विघटन होते आणि या विघटनाचीच शारीरिक चेतनेला भीती वाटत असते. आणि तरीही हे रूप सारखे बदलत राहते आणि मूलत: या बदलास प्रगत होण्यापासून रोखू शकेल असे काहीच असत नाही. हा प्रागतिक बदलच भविष्यात मृत्युची अनिवार्यता नाहीशी करू शकेल. परंतु ही गोष्ट […]

अमर्त्यत्वाचा शोध १७

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०१ व्यक्ती मृत्युच्या भीतीवर कशी मात करू शकते? तर, यासाठी अनेक पद्धती उपयोगात आणता येऊ शकतात. परंतु, या आपल्या प्रयत्नांमध्ये साहाय्यभूत होतील अशा काही मूलभूत संकल्पना प्रथम लक्षात घेऊ. जाणून घेतली पाहिजे अशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जीवन हे एकसलग आहे आणि अमर्त्य आहे; फक्त […]

अमर्त्यत्वाचा शोध १६

…कदाचित मनुष्याच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो भीतीचा; ही भीती बहु-आयामी, अनेकरूपी, आत्म-विसंगत, अतार्किक, अविवेकी, बरेचदा युक्तिहीन असते. सर्व प्रकारच्या भीतींपैकी सर्वांत सूक्ष्म आणि सर्वांत चिवट अशी जर कोणती भीती असेल तर ती असते मृत्युची. या भीतीची पाळेमुळे अवचेतनेमध्ये (subconscious) खूप खोलवर रुजलेली असतात आणि तेथून ती उपटून काढणे ही गोष्ट सोपी नसते. अर्थातच […]

अमर्त्यत्वाचा शोध १५

प्रश्न : एखाद्याने आत्महत्या केल्यामुळे त्याला दु:खयातना का भोगाव्या लागतात? श्रीमाताजी : एखादा आत्महत्या का करतो ? कारण तो भ्याड असतो, भित्रा असतो… आणि भ्याड लोकांना नेहमीच दु:ख भोगावे लागते. प्रश्न : पुढील जन्मात देखील त्याला परत दु:खयातना भोगाव्या लागतात का? श्रीमाताजी : या जगात येण्यामागे, चैत्य पुरुषाचा (Psychic being) एक विशिष्ट हेतू असतो. अनेक […]

अमर्त्यत्वाचा शोध १४

प्रश्न : माणसं जर मृत्यूच पावली नाहीत, तर वाढत्या वयाबरोबर त्यांचे शरीर निरूपयोगी होणार नाही का? श्रीमाताजी : नाही, तुम्ही चुकीच्या बाजूने पाहात आहात. त्यांच्या शरीराचा ऱ्हास झाला नाही तरच ते मृत्युपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतील. शरीराचा ऱ्हास होतो त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांचे शरीर निरुपयोगी होते त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांना […]

अमर्त्यत्वाचा शोध १०

या जन्मात तुमच्या प्राणतत्त्वाचे परिवर्तन झाले आहे की नाही यावर, तुमची मरणोत्तर स्थिती काय असेल हे पुष्कळसे अवलंबून असते. तुम्ही स्वतः म्हणजे जर अस्ताव्यस्त प्रेरणांचे एक मिश्रण असाल, तर मृत्युसमयी, ज्यावेळी तुमची चेतना मागे सरून पार्श्वभूमीमध्ये जाते, त्यावेळी तुमच्यातील भिन्नभिन्न व्यक्तिमत्त्वे अलग अलग होतात आणि त्यांना साजेसे वातावरण मिळावे म्हणून ती व्यक्तिमत्त्वे घाईघाईने इकडेतिकडे तसे […]

अमर्त्यत्वाचा शोध ०९

प्रश्न : शारीरिक देह हा संरक्षण म्हणून कशा रितीने कार्य करतो? ज्या जडतेबद्दल आपण आपल्या देहाला नावं ठेवत असतो त्या त्याच्या जडतेमुळेच हा शारीरिक देह संरक्षणाचे काम करत असतो. शरीर सुस्त, असंवेदनशील, निबर, अलवचीक आणि कठीण असते; बाजूने मजबूत तटबंदी असलेल्या गडकोटाप्रमाणे ते असते. तर प्राणिक जगत मात्र द्रवरूप असते, त्यातील गोष्टी प्रवाही असतात, त्या […]

अमर्त्यत्वाचा शोध ०५

आपले जीवन सत्कारणी लागावे अशी ज्यांची इच्छा असते, तेच असे म्हणतात की, ”जोवर आवश्यकता आहे तोवर मी इथे राहीन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत! आणि माझे ध्येय साध्य करत असताना एकही क्षण मी व्यर्थ दवडणार नाही”, वेळ आली तर अशीच माणसं सर्वोत्तम कामगिरी करून दाखवितात. असे का? – कारण अगदी सोपे आहे, कारण ते त्यांच्या ध्येयासाठी जगतात, […]

अमर्त्यत्वाचा शोध ०४

परिस्थिती कशीही असो, तुमच्या मनाला जर त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय असेल तर तुम्हाला ती असुखकारक वाटणार नाही. ही गोष्ट सर्वज्ञात आहे की, जोपर्यंत मन एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्यास नकार देते, त्याच्या विरोधात झगडत राहते, त्याच्यात अडथळा आणू पाहते, तोपर्यंत दु:खयातना, अडचणी, वादळे, आंतरिक संघर्ष आणि सर्व दु:खभोग आहेत. पण ज्या क्षणी मन म्हणते, ”ठीक […]

,

अभीप्सा

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३० …येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान […]