Entries by श्रीमाताजी

योग आणि मानवी नातेसंबंध – १०

तुम्हाला तुमच्या कनिष्ठ पातळीवर घसरण्यास प्रोत्साहन देणारा, त्याच्यासोबत तुम्हीही मूर्खपणाच्या गोष्टी कराव्यात म्हणून प्रोत्साहन देणारा किंवा त्याच्या सोबत चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणारा किंवा तुम्ही ज्या हीन गोष्टी करत आहात त्याचे कौतुक करणारा असा कोणी ‘मित्र’ असू शकत नाही; हे अगदी स्पष्ट आहे. आणि तरीसुद्धा, कनिष्ठ पातळीवर उतरल्यावर देखील ज्यांच्यासोबत असताना अस्वस्थता (चुकल्या-चुकल्या सारखे) […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ०९

(श्रीमाताजींचे एक शिष्य ‘पवित्र’ पुढील वचन वाचून दाखवितात…) “आपल्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे त्यानिशी जो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण जसे आहोत, त्यापेक्षा काहीतरी निराळे असावे, अशी अधिकची अपेक्षा जो बाळगत नाही, तो आपला उत्तम मित्र.” (CWM 14 : 288) श्रीमाताजी : आपण जी गोष्ट नेहमी विसरतो त्याच्या अनुषंगाने मी हे विधान केले होते. ती […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ०८

प्रश्न : खरेखुरे प्रेम कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर, प्रकृतीचे रूपांतरण होणे आवश्यक आहे का? श्रीमाताजी : तुमच्या प्रेमाची गुणवत्ता ही तुमच्या चेतनेच्या रूपांतरणाच्या प्रमाणात असते. प्रश्न : मला समजले नाही. श्रीमाताजी : लहान मुलालादेखील समजेल इतके हे सोपे आहे. तुमची चेतना ही जर पशुवत असेल तर, तुम्ही प्राण्यांसारखेच प्रेम कराल. तुमची चेतना […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ०४

…आपल्या कृतीला योग्य दिशा देण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांबाबत असलेल्या आपल्या चुकीच्या दृष्टिकोनाची कारणे शक्य तितक्या किमान पातळीवर आणण्यासाठी, आपल्या संपर्काची जी असंख्य कारणे असतात ती आपण नेहमीच अत्यंत काळजीपूर्वकपणे तपासली पाहिजेत आणि आपल्याला त्या सहकाऱ्यांशी संबद्ध करणाऱ्या आत्मीयतेचा प्रकार (शारीरिक, प्राणिक, अंतरात्मिक आणि मानसिक आत्मीयता) कोणता ते शोधून काढले पाहिजे. अगदी काही थोड्याच व्यक्ती एकाच […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ०३

काही विशिष्ट अपवाद वगळता, आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा जे आपल्याला रस्त्यामध्ये, आगगाडीमध्ये, जहाजामध्ये, बसमध्ये योगायोगाने भेटतात अशा व्यक्तींना आपण भौतिक मदत पुरविणे, हे सर्वांत चांगले साहाय्य असते. उदाहरणार्थ, आर्थिक मदत, आजारपणामध्ये किंवा संकटामध्ये असताना केलेली मदत इ. आपल्यासारखीच कलाभिरुची किंवा अन्य रुची असल्यामुळे जे आपल्याकडे आकर्षित झालेले असतात, त्यांच्या ऐंद्रिय-ऊर्जांमध्ये सुधारणा घडवून, त्यांमध्ये समतोल घडवून […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ०२

एकसारख्या असणाऱ्या इच्छा आणि आवेग यांच्यामध्ये ‘प्राणिक संपर्क’ (Vital contact) घडून येतो किंवा परस्परांना पूरक ठरण्यासाठी आणि एकमेकांना अधिक उन्नत करण्यासाठी त्यांचे एकत्र येणे क्रमप्राप्त असते. आध्यात्मिक आकांक्षांच्या अभिसरणातून ‘आंतरात्मिक संपर्क’ (Psychic contact) घडून येतो. समानधर्मा किंवा परस्परपूरक मानसिक क्षमता व आवडीनिवडी यांमधून ‘मानसिक संपर्क’ (Mental contact) निर्माण होतो. सर्वसाधारणपणे, जर कोणत्याही एका प्रकाराचे प्राबल्य […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ०१

आपल्याला आपल्या सारख्याच असणाऱ्या माणसांच्या संपर्कात आणणारी जी कारणं असतात त्या कारणांचे जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले तर आपल्या असे लक्षात येते की, आपल्या अस्तित्वाच्या विविध गहन पातळ्यांवर हे संपर्क घडून येतात. आपण जागृतपणे जो व्यवहार करत असतो, त्याची आपली स्वतःची एक खास पद्धत असते, त्यावर हे संपर्क अवलंबून असतात. आपल्या व्यवहाराच्या ज्या चार मुख्य […]

अमर्त्यत्वाचा शोध ३९

अतिमानसिक देह जे अतिमानसिक शरीर येथे अस्तित्वात आणायचे आहे त्या शरीराची हलकेपणा (lightness), अनुकूलनशीलता (adaptability), विकासानुगामित्व (plasticity) आणि प्रकाशमानता (luminosity), ही चार गुणवैशिष्ट्ये असतील. जेव्हा शरीर हे सर्वांगांने दिव्य होईल तेव्हा जणू काही असे वाटेल की, ते हवेमधून चालत आहे, त्यामध्ये कोणतेही जडत्व किंवा तमस किंवा अचेतनता असणार नाही. त्याच्या अनुकूलनशीलतेच्या शक्तीला कोणतीच मर्यादा असणार […]

अमर्त्यत्वाचा शोध ३७

शारीरिक परिवर्तन …तुमच्या शरीराची घडण कशी झाली? सर्व अवयव, सर्व कार्ये यांची घडण ही अगदी प्राण्यांच्या पद्धतीने झाली. तुम्ही पूर्णतः अवलंबून असता : तुमचे हृदय सेकंदाच्या हजाराव्या भागाइतका वेळ जरी बंद पडले तरी सगळे संपते, तुम्ही मरण पावता. सर्व गोष्टी चालू असतात आणि त्या आपोआप चालू असतात, तुमच्या जागृत इच्छेविना चालू असतात (आणि ते चांगलेच […]

अमर्त्यत्वाचा शोध ३६

अमर्त्यत्व समजून घेताना अमर्त्यत्व या शब्दाबद्दल काही गैरसमज आहेत आणि हे समज काही नवीन नाहीत; हे गैरसमज वारंवार होताना आढळतात. अमर्त्यत्वाविषयी जेव्हा कोणी बोलतो तेव्हा बहुतेक सगळ्यांना शरीराचे अस्तित्व अनंत काळ टिकून राहणार असे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे, शरीर अनंत काळपर्यंत तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा, त्याला त्याच्या अमर्त्य आत्म्याविषयी पूर्ण जाणीव होते आणि ते […]