Entries by श्रीमाताजी

योग आणि मानवी नातेसंबंध – ४०

तुम्ही या जगामध्ये एका विशिष्ट वातावरणामध्ये, विशिष्ट लोकांमध्ये जन्माला आलेले असता. तुम्ही जेव्हा अगदी लहान असता तेव्हा तुमच्या सभोवार जे असते ते तुम्हाला अगदी सहज-स्वाभाविक असे वाटत असते कारण तुम्ही त्यामध्येच जन्माला आलेले असता आणि तुम्हाला त्याची सवय झालेली असते. परंतु कालांतराने, तुमच्यामध्ये आध्यात्मिक अभीप्सा जागृत होते, तेव्हा ज्या वातावरणात आजवर तुम्ही राहत होतात त्याच […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ३५

श्रीमाताजी : हे जग म्हणजे संघर्ष, दुःखभोग, अडीअडचणी, ताणतणाव यांचे जग आहे; या सर्व गोष्टींनीच ते बनलेले आहे. ते अजूनपर्यंत बदललेले नाही; त्याला बदलायला अजून काही काळ जावा लागेल. आणि त्यामधून बाहेर पडण्याची एक शक्यता प्रत्येकापाशी असते. तुम्ही ‘परमेश्वरी कृपे’च्या उपस्थितीचा आश्रय घेतलात तर बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. प्रश्न : मग, आता आम्ही […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २९

काही लोकांच्या प्राणिक प्रकृतीला नेहमीच गोंधळ, विसंवाद, क्षुद्र भांडणं आणि गोंधळगडबड हवाहवासा वाटतो; त्याचप्रमाणे त्यांना बहुधा दु:ख-कष्टाचे एक प्रकारचे खूळ असते आणि त्यांना वाटत असते की, प्रत्येक जण त्यांच्या विरोधात आहे. यामध्ये सुधारणा करणे खूप अवघड असते आणि त्यासाठी प्रकृतीच्या आमूलाग्र रूपांतरणाची आवश्यकता असते. अशा लोकांशी वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया मनावर घ्यायच्या नाहीत […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २८

व्यक्ती जर दुर्बल नसेल तर ती कधीच हिंसक होणार नाही. दुर्बलता आणि हिंसा या दोन गोष्टी हातात हात घालून जातात. आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, जो माणूस खरोखर बलवान असतो तो कधीही हिंसक नसतो. हिंसा ही नेहमीच कोठेतरी दुर्बलता असल्याचे लक्षण असते. एखादा पीळदार स्नायू असणारा दणकट माणूस स्वतःच्या सर्व ताकदीनिशी दुसऱ्या एखाद्या […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २७

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात यामुळे व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, फक्त ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे. मग अशा वेळी, प्रेम, सहिष्णुता, समंजसपणा, धीर या सगळ्या गोष्टींनी युक्त असे ईश्वरी वातावरण स्वतःबरोबर बाळगण्याऐवजी, दुसऱ्याच्या अहंकाराला प्रत्युत्तर म्हणून कठोरपणा […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २२

एखादी व्यक्ती जोपर्यंत तुमच्या कल्पना आणि तुमच्या मतांशी सहमत होत नाही तसेच तिची कार्यपद्धती तुमच्या कार्यपद्धतीशी मेळ राखणारी नसते, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीशी सुसंवाद साधू शकत नाही, त्यातून सर्व त्रास निर्माण होतात. तुम्ही तुमची चेतना अधिक विशाल केली पाहिजे आणि हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीचे तिचे तिचे स्वतःचे असे काही नियम असतात. सर्वांच्या […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २०

जेव्हा व्यक्ती ‘ईश्वरा’वर खऱ्या अर्थाने आणि समग्रतया प्रेम करत असते तेव्हा व्यक्ती त्या ‘ईश्वरा’ने निर्माण केलेल्या सृष्टीवर आणि प्राणिमात्रांवरही प्रेम करते आणि साहजिकपणेच, या प्राणिमात्रांमधील काही जण त्या व्यक्तीला निकटचे वाटू शकतात आणि त्यांच्यावर ती व्यक्ती विशेष प्रेम करत असते. परंतु तेव्हा व्यक्तीला जे प्रेम वाटते ते सामान्य मानवी प्रकारचे स्वार्थी प्रेम नसते; आपला ताबा […]

योग आणि मानवी नातेसंबंध – १९

एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती अशी अपेक्षा करते की, त्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि ते प्रेमदेखील तिने तिच्या पद्धतीने व तिच्या स्वभावानुसार करता कामा नये तर, माझ्या पद्धतीने व माझ्या इच्छांचे समाधान होईल अशा पद्धतीनेच केले पाहिजे, आणि सहसा व्यक्ती हीच चूक पहिल्यांदा करते. सर्व मानवी दुःखांचे, निराशांचे, […]

योग आणि मानवी नातेसंबंध – १७

खरे प्रेम एकच असते आणि ते प्रेम म्हणजे ‘ईश्वरी प्रेम’; प्रेमाची इतर सर्व रूपं म्हणजे त्या ईश्वरी प्रेमाची विरूपे असतात, त्या प्रेमाची संकुचित, मर्यादित रूपं असतात. अगदी भक्ताचे देवावरील प्रेम हे सुद्धा एक प्रकारे प्रेमाचा ऱ्हासच असतो, कारण ते बरेचदा अहंकाराने कलंकित झालेले असते. परंतु, व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासारखी बनण्याकडे तिचा स्वाभाविक कल असतो […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ११

…व्यक्ती ज्याला सारे काही सांगू शकेल, ज्याच्यासमोर सारे काही उघड करू शकेल असा तो ईश्वरच व्यक्तीचा सर्वोत्तम मित्र असू शकत नाही का? कारण खरोखरच तोच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, पुन्हा पुन्हा केल्या नाहीत तर, साऱ्या चुका दूर करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो; जो सर्व जाणू शकतो, साऱ्यावर […]