Entries by श्रीमाताजी

एका नवीन साक्षात्काराच्या दिशेने

ईश्वरी कृपा – २२ एके काळी माणसाची आध्यात्मिक अभीप्सा सगळ्या लौकिक गोष्टींपासून अलिप्त होत, जीवनापासून पलायन करत, नेमकेपणाने सांगायचे तर लढाई टाळत, संघर्षाच्या अतीत होत, साऱ्या प्रयत्नांपासून स्वतःची सुटका करून घेत, शांत, निष्क्रिय शांतिकडे वळलेली होती; या आध्यात्मिक शांतिमध्ये, संघर्ष, प्रयत्न, सर्व प्रकारच्या ताणतणावांची समाप्ती होत असेच; पण त्याबरोबरच सर्व त-हेच्या दुःखभोगांचीदेखील समाप्ती होत असे […]

उच्च अपरिमित ‘ईश्वरी कृपा’

ईश्वरी कृपा – २१ मानवी बुद्धीच अशी आहे की, दोन गोष्टींमध्ये भेद असल्याखेरीज तिला कशाचे आकलनच होत नाही. कोणत्या तरी संकटातून ते वाचले म्हणून माझे आभार मानण्यासाठी लोकांची शेकडो पत्रं मला येत असतात; पण काहीच (विपरित) घडले नाही, म्हणून माझे आभार मानणारी पत्रं मला क्वचितच, अगदी क्वचितच येतात. ….कोणते तरी संकट आल्याखेरीज लोकांना ईश्वरी कृपेच्या […]

ईश्वरी कृपे’चा प्रतिसाद

ईश्वरी कृपा – २० एखाद्या व्यक्तीने जेव्हा ‘ईश्वर’प्राप्तीच्या साधनेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याबाबतीत ती व्यक्ती प्रामाणिक असते; म्हणजे असे की, तिचा संकल्प तळमळीचा, प्रामाणिक असून, तो प्रांजळपणे प्रत्यक्षात उतरविला जातो, तेव्हा त्या व्यक्तीने कशाचेच भय बाळगण्याचे कारण नाही; कारण तिच्याबाबतीत जे सारे घडते किंवा जे घडणार आहे ते तिला ईश्वराच्या […]

आपत्ती आणि ईश्वरी कृपा

ईश्वरी कृपा – १९ तुम्हाला जे ध्येय प्राप्त करून घ्यायचे आहे त्या दिशेने जाण्यास तुम्हाला प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणजे ‘कृपा’. तुमच्या मनाद्वारे तिचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू नका, त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही, कारण ती अशी एक महान गोष्ट आहे की, मानवी शब्द किंवा भावना यांद्वारे तिचे स्पष्टीकरण करता येत नाही. ‘ईश्वरी कृपे’मुळे जीवनात […]

ईश्वरी कृपे’विषयी श्रद्धा

ईश्वरी कृपा – १८ (व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, त्याची जडणघडण यावर विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी ‘ईश्वरी कृपे’बद्दल म्हणाल्या…) व्यक्तीच्या अंतरंगात जर ‘ईश्वरी कृपे’विषयी अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ‘ईश्वरी कृपा’ आहेच, आणि ती माझ्यावर दृष्टी ठेवून आहे तर, (व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, व आयुष्यभर बाळगू […]

कर्मबंधन आणि त्याचा निरास

ईश्वरी कृपा – १७ प्रश्न : तुम्ही असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो”, पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते… श्रीमाताजी : हो अगदी पूर्णपणे, ‘ईश्वरी कृपा’ कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते जसे वितळून जाईल, तसे होते. …तुमच्याकडे जर पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा […]

प्रामाणिक अभीप्सा आणि उत्कट प्रार्थना

ईश्वरी कृपा – १६ भविष्यामध्ये जो मार्ग उलगडत जाणार आहे, त्या मार्गाला बदलू शकण्यास; पुरेशी प्रामाणिक अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना या दोन गोष्टी सक्षम नसतात, असे कोण म्हणेल बरे? ह्याचाच अर्थ असा की, सर्व काही शक्य आहे. व्यक्तीकडे पुरेशी अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना मात्र हवी. मानवी प्रकृतिला ती देणगी देण्यात आलेली आहे. ईश्वरी […]

चुकांची पुनरुक्ती

ईश्वरी कृपा – १४ “खरोखरच, ईश्वरच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर एखाद्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या नाहीत तर त्याच्या सर्व चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो.” — श्रीमाताजी (आपल्या ह्या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी एके ठिकाणी म्हणतात की,) “व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा […]

कमकुवतपणाचा युक्तिवाद

ईश्वरी कृपा – १३ अज्ञानमूलक चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो, पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा लावलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा… असे करणे म्हणजे, अंधाराला हेतुत: परत बोलावण्यासारखेच आहे. …ज्यांनी स्वतःला […]

पुन्हापुन्हा येणाऱ्या अनुभूतींची आवश्यकता

ईश्वरी कृपा – १२ आत्यंतिक जडभौतिक चेतनेला, आत्यंतिक जडभौतिक मनाला चाबकाने फटकारल्यावरच काम करण्याची, प्रयत्न करण्याची आणि प्रगत होण्याची सवय झालेली असते; अन्यथा ते तमस असते. आणि जेव्हा कधी मन कल्पना करते, तेव्हा ते नेहमी अडीअडचणींची, अडथळ्यांची व विरोधाचीच कल्पना करते आणि त्यामुळे गती मोठ्या प्रमाणात मंदावते. सर्व अपयशांच्या पाठीमागे ‘यश’ असते; सर्व वेदना, दुःखभोग, […]