Entries by श्रीमाताजी

दु:खभोगाचे आनंदात रुपांतर

विचार शलाका – ०३ सर्व वेदना, दुःखभोग, संकटे, चिंता, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता, दुर्बलता ह्या गोष्टी विलगतेच्या भावनेतून आल्या आहेत. संपूर्णतया केलेले आत्मदान, संपूर्ण आत्मनिवेदनात (consecration) झालेला ‘मी’चा विलय, यामुळे दुःखभोग नाहीसे होतात आणि त्याची जागा, आनंदाने घेतली जाते की, जो कशानेही झाकोळला जात नाही. आणि असा आनंद जेव्हा या जगामध्ये स्थापित होईल, तेव्हाच […]

आपपर भाव

सद्भावना – ३० जोवर तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता. तुम्ही कायमच तुमच्या हृदयात सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि प्रगाढ शांतीने आणि समतेने त्यांचा सर्वांवर वर्षाव केला पाहिजे. – श्रीमाताजी (CWM 13 : 191)

चिंतामुक्त जीवन

सद्भावना – २९ साधे असणे खूप चांगले असते, फक्त सदिच्छा बाळगायची, आपल्याला करता येणे शक्य असेल ती उत्तमातील उत्तम गोष्ट आपण करायची आणि ती गोष्ट शक्य तेवढ्या सर्वोत्तम रीतीने करायची. त्यासाठी फार वेगळे असे काही करण्याची गरज नाही; फक्त प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची. आणि आपण काय केले पाहिजे आणि आपण कोण झाले पाहिजे […]

चूक व निवड

सद्भावना – २८ एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत नसताना जर ती गोष्ट तुमच्याकडून घडली असेल तर, तेव्हा तुम्ही ती चूक अज्ञानापोटी केलेली असते आणि म्हणून हे साहजिकच आहे की, नंतर जेव्हा तुम्हाला ती गोष्ट चुकीची होती हे समजते, आणि जेव्हा तुमचे अज्ञान नाहीसे झालेले असते तसेच तुमच्यापाशी सद्भाव असतो तेव्हा, तुम्ही तीच चूक परत […]

सद्भावनेचे सर्वत्र दर्शन

सद्भावना – २७ एकदोन दिवसांपूर्वी ‘पवित्र’ (श्रीमाताजींचे एक ज्येष्ठ शिष्य) जेव्हा पत्रांची जुळवाजुळव करत होते तेव्हा, मी इंग्रजीत कोणाला तरी लिहिलेले एक पत्र त्यांच्या पाहण्यात आले. त्यात असे लिहिले होते की, “जी व्यक्ती आपल्या चेतनेमध्ये सद्भावना बाळगते त्या व्यक्तीला, ती सद्भावना स्वतःहून सर्व वस्तुमात्रांमध्ये गुप्त असलेल्या सद्भावनेचे सर्वत्र दर्शन घडविते. भावनेचा भविष्याकडे थेटपणे घेऊन जाणारा […]

प्राणाच्या दोन प्रवृत्ती

सद्भावना – २६ (प्राणामध्ये (Vital) दोन प्रवृत्ती आढळतात – एक म्हणजे निराशेची आणि दुसरी अतिउत्साहाची. या दोन प्रवृत्तींना कसे हाताळावे, याविषयी चर्चा सुरू असताना, श्रीमाताजी पुढे सांगत आहेत…) अगदी काळजीपूर्वक टाळलाच पाहिजे असा हा एक मोठा अडथळा आहे. असमाधानाचे किंवा चिडचिडेपणाचे अगदी बारीकसे लक्षण जरी आढळले तरी, लगेचच आपण आपल्या प्राणाला असे सांगितले पाहिजे की, […]

खात्रीलायक आणि मोलाचे मार्गदर्शन

सद्भावना – २५ व्यक्ती ज्यावेळी अतिशय सतर्क आणि अतिशय प्रामाणिक असते तेव्हा, तिने हाती घेतलेल्या कामाचे किंवा ती करत असलेल्या कृतीचे मूल्य किती आहे किंवा काय आहे यासंबंधी, तिला एखादी आंतरिक पण सुस्पष्ट सूचना मिळू शकते. खरोखर, जिच्यापाशी पुरेपूर सद्भावना आहे अशी एखादी व्यक्ती असेल म्हणजे जी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणाने, तिच्या अस्तित्वाच्या समग्र जाणिवयुक्त भागानिशी, […]

आजारपण आणि योगमार्ग

सद्भावना – २४ प्रश्न : आजारपण येणे म्हणजे योगमार्गातील परीक्षा असते का? श्रीमाताजी : परीक्षा? अजिबातच नाही. प्रगती करावी म्हणून व्यक्तीला हेतुपुरस्सर आजारपण देण्यात येते का? नाही, नक्कीच ते तसे नाही. वास्तविक, तुम्ही हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने विचारात घेतली पाहिजे आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की, काही माणसं अशीही असतात की, ज्यांची अभीप्सा इतकी […]

चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणा

सद्भावना – २३ केवळ चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणाच खरी असते. प्राण आणि मन यांच्याकडून येणाऱ्या प्रेरणा या निश्चितपणे अहंकारमिश्रित असतात आणि अनियंत्रित असतात. बाहेरील संपर्काला प्रतिक्रिया म्हणून व्यक्तीने कृती करता कामा नये तर, प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या अपरिवर्तनीय (Immutable) दृष्टिकोनातून कृती केली पाहिजे. – श्रीमाताजी (CWM 14 : 334)

प्राणाचे साहाय्य व प्रगती

सद्भावना – २२ सर्वांत बाह्यवर्ती शारीरिक चेतना आणि चैत्य चेतना (Psychic Consciousness) या दोहोंमध्ये नित्य संपर्क प्रस्थापित करणे हे स्वाभाविकपणेच अतिशय कठीण असते. आणि या शारीरिक चेतनेपाशी भरपूर सद्भावना असते; ती अतिशय नियमित असते, ती खूप धडपड करते, पण ती मंद आणि जड असते, तिला खूप वेळ लागतो, ती प्रगत होणे कठीण असते. ती थकत […]