Entries by श्रीमाताजी

प्रामाणिकपणा – ०१

प्रामाणिकपणा – ०१ आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा! प्रामाणिकपणा हा केंद्रीय ‘दिव्य संकल्पा’च्या भोवती संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह व सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो. – श्रीमाताजी [CWM 14 : 65]

‘ईश्वरा’कडून आलेल्या गोष्टींचा स्वीकार

कर्म आराधना – ४२ त्या सर्व गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत, ज्या ‘ईश्वरा’कडून आलेल्या असतात, फक्त त्यांचाच स्वीकार तुम्ही केला पाहिजे. कारण छुप्या इच्छावासनांकडून देखील काही गोष्टी समोर येऊ शकतात. या इच्छावासना तुमच्या अवचेतन मनामध्ये कार्यरत असतात आणि जरी तुम्हाला त्या तुमच्या इच्छा म्हणून ओळखता आल्या नाहीत तरीसुद्धा, त्या इच्छावासना तुमच्या समोर अशा गोष्टी आणतात की, […]

खराखुरा योगिक दृष्टिकोन

कर्म आराधना – ४१ ईश्वरी आज्ञेचे अनुसरण करण्यास जर तुम्ही तयार असाल तर, तुम्हाला देण्यात आलेले कोणतेही कर्म, मग ते कर्म कितीही विलक्षण असले तरी, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे, आणि ज्या शांतचित्ताने तुम्ही ते कर्म स्वीकारले होते त्याच शांतचित्ताने तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी ते सोडूनही देता आले पाहिजे. (ते कार्य) ही फक्त तुमचीच […]

मानवतेची सेवा

कर्म आराधना – ४० मानवतेची सेवा करण्याची कल्पना ही महत्त्वाकांक्षेच्या अत्यंत सामान्य रूपांपैकी एक रूप आहे. अशा प्रकारच्या सेवेविषयी किंवा कार्याविषयी असणारी सर्व आसक्ती ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची खूण असते. ज्या ‘गुरुं’ची अशी समजूत असते की, त्यांच्यापाशी मानवतेला शिकविण्यासाठी एक फार महान सत्य आहे आणि ज्यांना भरपूर मोठा शिष्यवर्ग हवा असतो आणि शिष्य त्यांच्यापासून निघून जातात […]

आळस आणि अक्रियता

कर्म आराधना – ३७ आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात. स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. * […]

कौशल्यपूर्ण कर्म

कर्म आराधना – १५ कौशल्यपूर्ण हात, स्वच्छ दृष्टी, एकाग्र अवधान, अथक चिकाटी या गोष्टी व्यक्तीपाशी असताना व्यक्ती जे काही करेल ते उत्कृष्टच असेल. * कौशल्यपूर्ण हात, काटेकोर काळजी, टिकून राहणारे अवधान या गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील ती व्यक्ती ‘जडभौतिका’ला ‘चैतन्या’च्या आज्ञा पाळण्यास भाग पाडते. – श्रीमाताजी (CWM 14 : 308)

कार्य अर्धवट सोडून द्यायचे ?

कर्म आराधना – १४ एका नवीन गोष्टीच्या उभारणीसाठी आधीची गोष्ट मोडावी लागणे हे काही चांगले धोरण नव्हे. जे समर्पित झालेले आहेत आणि जे ‘ईश्वरा’साठी कार्य करू इच्छितात त्यांनी धीर धरला पाहिजे आणि गोष्टी योग्य क्षणी व योग्य पद्धतीने करण्यासाठी, वाट कशी पाहावी हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. * एखादे कार्य हाती घ्यायचे आणि ते तसेच […]

परिपूर्णतेची आस आणि खरी आध्यात्मिकता

कर्म आराधना – १३ कर्मामध्ये सुव्यवस्था आणि सुमेळ असला पाहिजे. वरकरणी पाहता जी गोष्ट अगदीच सामान्य वाटते ती गोष्टसुद्धा अगदी परिपूर्ण पूर्णतेने, स्वच्छतेच्या, सौंदर्याच्या, सुमेळाच्या भावनेने आणि व्यवस्थितपणाने केली पाहिजे. * कर्मामध्ये ‘परिपूर्णते’ची आस बाळगणे ही खरी आध्यात्मिकता. – श्रीमाताजी (CWM 14 : 305-306)

कर्मातील परिपूर्णत्व

कर्म आराधना – १२ ‘ईश्वरी शक्ती’प्रत स्वतःला अधिकाधिक खुले करा म्हणजे मग तुमचे कर्म हळूहळू परिपूर्णत्वाच्या दिशेने प्रगत होत राहील. * ‘ईश्वरा’च्या कार्याचे एक परिपूर्ण साधन बनण्यासाठी आपण सातत्याने आस बाळगूया. * कर्मातील परिपूर्णत्व हाच तुमचा आदर्श असला पाहिजे, असे झाले तर तुम्ही ‘ईश्वरा’चे सच्चे साधन बनाल याविषयी खात्री बाळगा. – श्रीमाताजी (CWM 14 : […]

साधना आणि मनःशांती

कर्म आराधना – ११ प्रश्न : साधना आणि मनाच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? श्रीमाताजी : १) कर्म हे साधना म्हणून करा. तुमच्या सर्वोच्च क्षमतेनिशी तुम्ही जे कर्म केले असेल, ते ‘ईश्वरा’ला अर्पण करा आणि कर्मफल ‘ईश्वरा’वर सोपवा. २) तुमचा मेंदू शक्य तेवढा शांत ठेवून, तुमच्या मस्तकाच्या ऊर्ध्वदिशेस सचेत होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर यामध्ये […]