Entries by श्रीमाताजी

उच्च अपरिमित ईश्वरी कृपा

कृतज्ञता – १८ कोणते तरी संकट आल्याशिवाय लोकांना ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची जाणीवच होत नाही; म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडणार असतो किंवा एखादा अपघात घडलेला असतो आणि त्यातून ते सहीसलामत वाचलेले असतात, तेव्हा लोकांना त्या कृपेची जाणीव होते. पण एखादा प्रवास किंवा तत्सम कोणता प्रसंग, जर विनाअपघात सुरळीत पार पडला, तर ती त्याहूनही अधिक उच्च अपरिमित […]

,

निंदकाचे घर असावे शेजारी

कृतज्ञता – १७ (श्रीमाताजी येथे ‘धम्मपदा’तील एका वचनाविषयी विवेचन करत आहेत.) मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्या व्यक्तीविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची तुम्ही इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे धम्मपदामध्ये तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात […]

निरपेक्ष, निर्व्याज कृती

कृतज्ञता – १६ प्राण्यांचे मन अगदी अर्धविकसित असते. अविरत चालणाऱ्या विचारमालिकांमुळे माणसांची जशी छळवणूक होते तशी, प्राण्यांची होत नाही. उदाहरणार्थ, त्यांच्याशी कोणी प्रेमाने वागले तर, त्यांच्यामध्ये अगदी सहजपणे कृतज्ञतेची भावना निर्माण होते. पण हेच जर माणसांबाबतीत घडले तर, १०० पैकी ९९ वेळा माणसे विचार करायला लागतात. मनाशीच म्हणतात, ”अमुक एक व्यक्ती माझ्याशी चांगली वागली, त्यामध्ये […]

अडचणींचे मूळ कारण

कृतज्ञता – १५ शारीरिक चेतनेने प्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे; ती अशी की, आपल्याला जीवनात ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्या साऱ्या अडीअडचणी – आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या साहाय्यासाठी फक्त आणि फक्त ‘ईश्वरा’वरच विसंबून राहत नाही – या एकाच वास्तवातून उद्भवतात. वैश्विक ‘प्रकृती’च्या यंत्रणेपासून केवळ ‘ईश्वर’च आपल्याला मुक्त करू शकतो. नव्या वंशाच्या जन्मासाठी […]

आंतरिक विनम्रता

कृतज्ञता – १४ प्रश्न : ‘ईश्वरी कृपा’ कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा मार्ग कोणता? श्रीमाताजी : सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवश्यकता जाणवली पाहिजे. हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या ईश्वरी कृपेविना तुम्ही असाहाय्य आहात याची जाणीव करून देणारी, एक विशिष्ट अशी आंतरिक विनम्रता असणे आवश्यक आहे. खरोखरच, तुम्ही त्याविना अपूर्ण आणि शक्तिहीन असता. सुरुवात करायची झाली तर ही […]

कृतज्ञता आणि कृतघ्नता

कृतज्ञता – ११ कृतघ्नता ही एक अशी गोष्ट आहे की, जी मला नेहमीच अतिशय वेदनादायक वाटत आली आहे. कृतघ्नता अस्तित्वातच कशी राहू शकते हे मला वेदनादायक वाटते. माझ्या जीवनात बघितलेल्या सर्व गोष्टींपैकी ही एक अशी गोष्ट आहे की जी सर्वाधिक असह्य अशी आहे. ‘ईश्वरा’बद्दलची ही एक प्रकारची विखारी कटुता आहे. …कृतघ्नता ही ‘मना’च्या बरोबरीने उदयाला […]

कृतज्ञता – शक्तिशाली तरफ

कृतज्ञता – १० काही जण असे असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे एक आश्चर्यकारक गोष्ट दडलेली आहे अशी त्यांची समजूत असते, आणि त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत […]

कृतज्ञता म्हणजे काय?

कृतज्ञता – ०९ ‘ईश्वरा’कडून जी ‘कृपा’ प्राप्त झालेली असते त्याबद्दलची स्नेहार्द्र जाणीव म्हणजे कृतज्ञता. ‘ईश्वरा’ने आजवर तुमच्यासाठी जे केले आहे आणि तो आजही तुमच्यासाठी जे करत आहे त्याची एक विनम्र जाणीव म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे ‘ईश्वरा’प्रति दायित्वाची अशी एक उत्स्फूर्त भावना असते की जी तुम्हाला – ‘ईश्वर’ तुमच्यासाठी जे काही करत आहे त्याला तुम्ही अपात्र […]

कृतज्ञतेचा विसर

कृतज्ञता – ०७ प्रश्न : माझ्या मनात नेहमीच असा विचार येतो की, माताजी मी तुमच्यापाशी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू? श्रीमाताजी : माझ्याप्रति तशी (कृतज्ञता व्यक्त करण्याची) तसदी कोणीच घेत नाही. जेव्हा कधी एखादी अडचण येते, एखादा अडथळा येतो, किंवा एखादा आघात होतो तेव्हा लगेच माझ्यापाशी प्रार्थना केली जाते, मदतीची अशी याचना केली जाते की, […]

कृतज्ञतेचे प्रकार

कृतज्ञता – ०५ कृतज्ञतेचे प्रकार : ‘ईश्वरी कृपे’च्या तपशीलांविषयी आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करणारी जी कृतज्ञता असते ती म्हणजे ‘तपशीलवार कृतज्ञता’. जिच्याद्वारे आपले संपूर्ण अस्तित्व, स्वतःला पूर्ण विश्वासानिशी, त्या ‘प्रभू’पाशी समर्पित करते, ती असते ‘परिपूर्ण कृतज्ञता’. मनाची अशी कृतज्ञता की जिच्यामुळे मन प्रगती करू शकते ती म्हणजे ‘मानसिक कृतज्ञता’ – श्रीमाताजी (CWM 14 : 154)