परिपूर्ण चेतना प्राप्त करून घेण्याचा मार्ग
विचारशलाका ३७ परिपूर्ण चेतना प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची प्रत्यक्ष चेतना ही तिच्या सद्यस्थितीतील सवयी व कक्षा यांच्या पलीकडे वृद्धिंगत करणे; तिला प्रशिक्षण देणे, तिला ‘दिव्य प्रकाशा’च्या दिशेने खुली करणे, तिच्यामध्ये ‘दिव्य प्रकाशा’ला त्याचे कार्य मुक्तपणे आणि परिपूर्णपणे करू देणे. परंतु तो ‘दिव्य प्रकाश’ तेव्हाच त्याचे कार्य परिपूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो […]






