Entries by श्रीमाताजी

प्रामाणिकपणा – १५

प्रामाणिकपणा – १५ तुम्ही जेव्हा पूर्णत: प्रामाणिक व्हाल, तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्यामध्ये पूर्णतः निर्भेळ असे काहीही नाही. मात्र तुम्ही तुमच्या सर्वोच्च चेतनेच्या प्रकाशात, स्वतःकडे स्वतःच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत, तर मग, तुमच्या प्रकृतीमधील जे काही काढून टाकायची तुमची इच्छा असेल ते नाहीसे होईल. अशा संपूर्ण प्रामाणिकपणासाठी प्रयत्न केला नाही तर एखादा दोष […]

,

प्रामाणिकपणा – १४

प्रामाणिकपणा – १४ (‘प्रामाणिकपणा’ कसा अतिशय आवश्यक असतो, हे मुलांना अगदी लहानपणापासूनच सांगण्याबाबत श्रीमाताजी आग्रही असत. त्याचे स्पष्टीकरण करताना, त्या म्हणतात…) दुसऱ्यांपेक्षा चलाख कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण शिक्षणाच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत […]

प्रामाणिकपणा – १३

प्रामाणिकपणा – १३ जो प्रामाणिकपणे ‘योगमार्गा’चे आचरण करतो त्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य व शांती लाभणे क्रमप्राप्तच असते. पण बहुसंख्य लोक असे असतात की, जे स्वत:लाच फसवतात; त्यांना असे वाटत असते की, ते ‘योगमार्गा’चे अनुसरण करत आहेत पण ते काही अंशीच साधना करत असतात आणि ते विरोधाभासाने भरलेले असतात. * मानसिक, प्राणिक वा […]

प्रामाणिकपणा – १२

प्रामाणिकपणा – १२ व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो. * स्वतःशी प्रामाणिक राहा – आत्म-वंचना नको. ‘ईश्वरा’प्रत प्रामाणिकपणा बाळगा – समर्पणात व्यवहार नको. मानवतेप्रत सरळसाधे असा – त्यात ढोंगीपणा वा दिखावा नको. – श्रीमाताजी [CWM 14 : 68-70]

प्रामाणिकपणा – ११

प्रामाणिकपणा – ११ प्रश्न : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नको, केवळ ‘ईश्वर’च हवा आहे. पण जेव्हा माझा दुसऱ्या माणसांशी संबंध येतो, साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये जेव्हा मी गुंतलेला असतो, त्यावेळी साहजिकच मला माझ्या एकमेव ध्येयाची, ‘ईश्वरा’ची आठवण राहात नाही. हा अप्रमाणिकपणा असतो का? तसे नसेल, या साऱ्याचा अर्थ काय? श्रीमाताजी […]

प्रामाणिकपणा – १०

प्रामाणिकपणा – १० जे तळमळीचे आणि प्रामाणिक असतात त्यांचा ‘ईश्वर’ नेहमीच सोबती असतो. * संपूर्ण प्रामाणिकपणा आणि खरेपणा यामध्येच मुक्ती आहे. * ‘प्रामाणिकपणा’ व ‘निष्ठा’ हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत. * जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकता असते तेव्हा तेथे मात्र मी […]

प्रामाणिकपणा – ०९

प्रामाणिकपणा – ०९ तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे. ढोंग करू नका – प्रामाणिक बना. केवळ आश्वासने देऊ नका – तशी कृती करा. नुसती स्वप्ने बघू नका – ती प्रत्यक्षात उतरवा. * पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही. – श्रीमाताजी [CWM 14 : 66]

प्रामाणिकपणा – ०८

प्रामाणिकपणा – ०८ ‘ईश्वरा’प्रत असलेल्या तुमच्या आत्मनिवेदनात तुम्ही प्रामाणिक आणि परिपूर्ण व्हा म्हणजे तुमचे जीवन हे सुसंवादी आणि सुंदर होईल. * घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक कवच आहे. * तुम्ही जर अगदी तळमळीने ‘ईश्वरा’ला म्हणाल की, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ‘ईश्वर’ अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल. […]

प्रामाणिकपणा – ०६

प्रामाणिकपणा – ०६ तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या तत्त्वाशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता. प्रत्येक क्षणी म्हणजे, तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रीतीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी […]

प्रामाणिकपणा – ०५

प्रामाणिकपणा – ०५ ….केवळ बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा’ प्रत्यक्षात तसे ‘असणे’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण आणि निर्दोष असेल, तर आपण चांगले आहोत असे दाखविण्याची गरज नाही. आणि ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा’ म्हणजे आम्हाला असे म्हणायचे आहे की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, फक्त आपल्या अस्तित्वाचे मध्यवर्ती ‘सत्-तत्त्व’च आविष्कृत झाले […]