बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व
प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ? श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. सर्व घटना मग त्या चांगल्या असोत की वाईट, दुःखीकष्टी न होता, नाउमेद न होता, उतावीळ आणि अस्वस्थ न होता, सहन करण्याची शक्ती म्हणजे आत्म्याचे समत्व. समत्व असले की, काहीही घडले तरी तुम्ही प्रसन्न, शांत राहता. […]







