पूर्णयोगाची वैशिष्ट्ये
वरची उच्चतर दिव्य प्रकृती, खालच्या निम्नतर अदिव्य प्रकृतीवर समग्रपणे रूपांतराचे कार्य करते तेव्हा या कार्याच्या तीन बाजू असतात.आणि त्या सर्वच महत्त्वाच्या आहेत. या कार्याची पहिली बाजू : योगाच्या विशेष विशिष्ट पद्धतीत जसा ठरावीक क्रम असतो, जशी ठरावीक पद्धती असते त्याप्रमाणे दिव्य प्रकृती एखाद्या ठरावीक पद्धतीनुसार व एखाद्या ठरावीक कार्यक्रमानुसार काम करत नाही. दिव्य प्रकृती स्वैर […]







