भगवंताचा गुलाम
…भगवंताचा गुलाम असणे हे अधिक उत्तम ! – श्रीअरविंद (CWSA 12 : 495)

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.
…भगवंताचा गुलाम असणे हे अधिक उत्तम ! – श्रीअरविंद (CWSA 12 : 495)
समत्व समत्व म्हणजे केवळ शांती नव्हे आणि तटस्थताही नव्हे किंवा अनुभवांपासून मागे हटणेही नव्हे, तर आपल्या मनाच्या व प्राणाच्या ज्या वर्तमान प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे, अतीत जाणे म्हणजे समत्व. समत्व म्हणजे जीवनाला आध्यात्मिक रीतीने सामोरे जाणे, प्रतिसाद देणे. किंबहुना आध्यात्मिक रीतीने जीवनाला कवळणे आणि आपल्या जीवनाला स्वतःच्या व आपल्या आत्म्याच्या कृतीचे परिपूर्ण रूप बनण्यास […]
समर्पण – ५९ हातचे काहीही राखून न ठेवता, स्वत:च्या सर्व घटकांनिशी जे स्वत:ला ‘ईश्वरा’स समर्पित करतात अशा साधकांना, ‘ईश्वर’ स्वत:लाच देऊन टाकतो. अशा साधकांना स्थिरता, प्रकाश, शक्तीसामर्थ्य, परमानंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता आणि आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात. – श्रीअरविंद (CWSA 29 : 67)
समर्पण – ५८ या योगामध्ये दोन प्रक्रिया असतात, आणि त्यामध्ये एक संक्रमण-अवस्था असते; या योगाचे दोन कालावधी असतात – एक समर्पणाची प्रक्रिया आणि त्याचा परिणामस्वरूप असणारा, कळसाध्याय! योगसाधनेचा पहिला टप्पा : पूर्वतयारी पहिल्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती तिच्या घटकांमध्ये दिव्यत्वाचे ग्रहण करता यावे म्हणून स्वतःला तयार करत असते. या पहिल्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांच्या माध्यमाद्वारेच […]
समर्पण ५५ समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया चांगल्या रीतीने सुरू झालेली असली तरीदेखील, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वरी अस्तित्व’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे […]
समर्पण – ५४ कोणताच मार्ग हा पूर्णतः सोपा नसतो आणि समर्पणाच्या मार्गाबाबत सांगायचे तर, खरेखुरे आणि संपूर्ण समर्पण करणे हीच एक मोठी अवघड गोष्ट असते. परंतु एकदा का ते घडून आले की मग त्यामुळे गोष्टी निश्चितपणे अधिक सोप्या होतात – म्हणजे या साऱ्या गोष्टी क्षणार्धात घडून येतात असे नाही किंवा अडीअडचणी नाहीशा होतात असेही नाही; […]
समर्पण – ५३ समर्पण नसेल तर संपूर्ण अस्तित्वाचे रूपांतरण शक्य नाही. – श्रीअरविन्द (CWSA 29 : 79) * आपल्याला शारीर चेतनेचा त्याग नव्हे तर, तिचे रूपांतरण करायचे आहे. आणि म्हणूनच, येथे श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा मार्ग सुचविला आहे. तो मार्ग आहे ‘ईश्वरा’प्रत समर्पणाचा मार्ग – शारीरिक क्रिया आणि शारीरचेतना यांचा समावेश करून […]
समर्पण – ५१ स्वतः काही केल्याशिवाय श्रीमाताजींकडे (कशाचीही) मागणी न करणे; तर आनंद आणि शांती अवतरतात तेव्हा त्यांचा प्रभाव आणि त्यांचे मार्गदर्शन पूर्ण मनोभावे स्वीकारणे; कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, दोष शोधत न बसता तो आनंद आणि ती शांती स्वीकारणे आणि त्यांची आपल्यामध्ये वृद्धी होऊ देणे; ‘शक्ती’ कार्यरत झाल्याचा अनुभव येतो तेव्हा कोणताही विरोध न […]
समर्पण – ५० परिपूर्ण असा आत्म-समर्पणाचा दृष्टिकोन अगदी थोड्या प्रमाणात जरी प्रस्थापित करता आला तरी, योग-क्रियांची सारी आवश्यकता अपरिहार्यपणे संपुष्टात येते. कारण तेव्हा आपल्या अंतर्यामीचा ‘देव’ स्वतःच साधक आणि सिद्ध बनतो आणि त्याची दिव्य शक्ती आपल्यामध्ये कार्य करते,… अगदी सर्वाधिक शक्तिशाली राजयोगांतर्गत संयम, सर्वाधिक विकसित प्राणायाम, अत्यंत कठोर ध्यान, अतीव आनंददायी ‘भक्ती’, आत्म-त्यागाची कृती; या […]
समर्पण – ४६ व्यक्तिगत प्रयत्न हे उत्तरोत्तर ‘दिव्य शक्ती’च्या क्रियेमध्ये रूपांतरित केले पाहिजेत. जर तुम्हाला दिव्य शक्तीची जाणीव होत असेल तर, तुमच्या प्रयत्नांना त्या दिव्य शक्तीने अधिकाधिक संचालित करावे, तिने ते प्रयत्न हाती घ्यावेत आणि (तिने ते प्रयत्न हाती घेतल्यानंतर,) ते प्रयत्न तुमचे न राहता, ते श्रीमाताजींचे व्हावेत यासाठी, त्या दिव्य शक्तीने त्या प्रयत्नांचे रूपांतर […]






