Entries by श्रीअरविंद

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १३

(इसवी सन : १८९० ते १९०६) आपल्याकडे ज्ञानाची कमतरता आहे का? आम्ही भारतीय तर अशा देशात जन्माला आलो आहोत, अशा देशामध्ये आमचे भरणपोषण झाले आहे की, जेथे मानववंशाच्या प्रारंभापासूनचे ज्ञानसंचित आहे, हजारो वर्षांपासून वारशाने मिळालेली संपदा आपल्याकडे आहे. या ज्ञानसंचितामध्ये भर घालण्यासाठी आजही ज्ञानाचे महामेरू आपल्यामधून उदयाला येत आहेत. आपली क्षमता आक्रसलेली नाहीये, आपल्या बुद्धीची […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १२

(दिनांक : १९ जून १९०९) आमच्या दृष्टीने हिंदुधर्म, सर्वात शंकेखोर आणि सर्वाधिक विश्वासार्ह आहे; तो शंकेखोर आहे असे म्हणण्याचे कारण की त्याने सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याने सर्वाधिक प्रयोग केले आहेत. तो सर्वाधिक विश्वासार्ह आहे असे म्हणण्याचे कारण की, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण व सकारात्मक आध्यात्मिक ज्ञान आणि सखोल अशी अनुभूती आहे. असा हा विशाल ‘हिंदुधर्म’ […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – ११

(दिनांक : १९ जून १९०९) प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ‘ईश्वरा’चे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “जर तुमची मने युरोपियन कल्पनांनी भारलेली असतील, जर तुम्ही आपल्या जीवनाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहत असाल, तर वरील ध्येये तुम्ही स्वत:पुढे ठेवू शकणार नाही; ती साध्य करून घेणे तर दूरच. भौतिक दृष्टीने पाहिले […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १०

(दिनांक : १९ जून १९०९) मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – ०९

(दिनांक : १९ जून १९०९) भारतामध्ये राष्ट्रनिर्माणाचे जे कार्य सुरु झाले आहे, ते इतक्या वेगाने, इतक्या सुस्पष्टपणे जगासमोर येत आहे की, त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे. आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते ह्या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणले गेलेले साहित्य यामधील वेगळेपण पाहू शकत आहेत. […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – ०८

(दिनांक : ११ एप्रिल १९०८) राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसहाय्यतेच्या तत्त्वाआधारे, आम्ही पुनरुत्थानाच्या ज्या काही योजना आखत आहोत, मग ते औद्योगिक पुनरुत्थान असो, शैक्षणिक पुनरुत्थान असो किंवा ती राजकीय पुनरुत्थानाची योजना असो ह्या सर्व योजना म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी घडून यावयासच हवे अशा एका अधिक गहन पुनरुत्थानाची केवळ दुय्यम अंगे आहेत. ‘भारत माता’ आपल्याकडून कोणत्याही योजनांची, नियोजित […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – ०७

(दिनांक : १७ सप्टेंबर १९०६) आपला इतिहास हा इतर लोकांच्या इतिहासापेक्षा अनेक बाबतीत भिन्न राहिलेला आहे. भारतीय लोकांची जडणघडण ही जगामध्ये एकमेवाद्वितीय अशी आहे. विविध जातीजमातींची लोकं एकत्रित आल्यामुळे, त्यांच्यामध्ये अभिवृद्धी होत होत राष्ट्रांचे विकसन होत गेले, ही आधीची प्रक्रिया होती. परंतु, भारत हा केवळ विविध जातीजमातींच्या एकत्र येण्याचे स्थान नसून, तो अशा विकसित राष्ट्रांच्या […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – ०६

(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९) हिंदुत्वाला एकत्रित आणण्यासाठी केवळ दोनच गोष्टी पुरेशा समर्थ आहेत – एक अशी नवी आध्यात्मिक प्रेरणा की जी, वेदान्तावर आधारलेली असेल, मानवाच्या मूलभूत एकत्वावर भर देणारी असेल, …ती बंधुता, स्वातंत्र्य, समता यांच्या भव्यदिव्य आदर्शावर उभारलेली असेल आणि तिला भारतीय वंश तसेच हिंदु आध्यात्मिक संकल्पना आणि साधना यांच्या थोर कार्याची आणि दमदार […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – ०५

(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९) एकेकाळी ‘भारतीय’ एकता आणि सहिष्णुता यांच्याकडे कल असणारी ‘मोगल’ सत्ता पुढे जेव्हा दडपशाही करणारी आणि विघातक अशी बनली तेव्हा ती उलथून टाकणे हे राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट होते आणि तेव्हा म्हणजे ‘शिवाजीमहाराज’ आणि ‘समर्थ रामदास’ यांच्या काळात ‘हिंदु’ राष्ट्रीयत्वाला काही एक अर्थ होता. हे त्याकाळी शक्य होते कारण ‘भारत’ तेव्हा स्वत:च […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – ०४

(सप्टेंबर १९०९) देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतना हे दोन विभिन्न गुण आहेत. देशभक्त त्याच्या मातृभूमीच्या सेवेच्या हर्षोन्मादामध्ये जीवन जगत असतो, तो तिचे सर्वत्र दर्शन घेतो, तो तिच्याकडे देवता म्हणून पाहतो. देशाच्या कल्याणासाठी केलेला यज्ञ या दृष्टिकोनातून तो त्याचे सर्व कार्य अर्पण करतो; त्याचे स्वत:चे हित हे देशाच्या हितामध्ये मिसळून गेलेले असते. एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश लोकांमध्ये अशी […]