Entries by श्रीअरविंद

, ,

पूर्णयोगाचे उद्दिष्ट

विचार शलाका – ०५ पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – २४

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा अखेरचा भाग…) विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – २३

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा तिसरा भाग…) आशिया खंडाचा उदय होत आहे आणि या खंडातील बहुतांशी भाग हे स्वतंत्र झाले आहेत किंवा ह्या घडीला ते स्वतंत्र होत आहेत; त्यातील इतर काही अंकित भाग […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – २२

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा दुसरा भाग…) भारत स्वतंत्र झाला आहे पण त्याला एकात्मता साध्य झालेली नाही; एक भंगलेले, विदीर्ण झालेले स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. एकवेळ तर असे वाटून गेले की, भारत पुन्हा […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – २१

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. आजपासून आपण ते भाषण क्रमश: प्रकाशित करत आहोत.) १५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – २०

(दिनांक ०५ मार्च १९०८) भारत हा राष्ट्रांचा गुरु आहे. मानवी जिवाला कितीही गंभीर आजार झाला असेना का, तरी त्याला त्यातून बाहेर काढणारा भारत हा धन्वंतरी आहे. जगाचे जीवन पुन्हा एकदा नवीन साच्यात ओतावे आणि मानवी चैतन्याची शांती त्याला पुन्हा एकदा गवसून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे. – श्रीअरविंद (CWSA 06-07 : 906)

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १९

(इ. स. १९१२) सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून ‘ईश्वर’ स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या ‘चतुर्युगा’मध्ये तो देश ‘भारत’ आहे. जेव्हा कधी तो ‘ईश्वर’ अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रुंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे ‘कालीच्या लीले’चे पूर्ण सौख्य […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १८

(ऑगस्ट १९०९) शाश्वत धर्माचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्या शाश्वत धर्मावर आधारित वंशधर्माचे आणि युगधर्माचे पालन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे…. ….आम्ही आमच्या धर्माच्या मार्गापासून ढळलेलो आहोत, आमच्या ध्येयापासून दूर झालेलो आहोत; प्रमादपूर्णतेचे, घोडचुकांचे, धादांत भ्रमाचे, धार्मिक गोंधळाचे बळी ठरलेले आपण, ‘आर्य’ शिक्षण आणि त्याच्या नियामक नीतीतत्त्वांपासून वंचित ठरलो आहोत. ‘आर्य’ वंशकुळातील असूनसुद्धा, […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १७

(दिनांक : १९ जून १९०९) आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नाही तर, नैतिक आणि आध्यात्मिक आहे. सरकार उलथवून लावणे हे आमचे उद्दिष्ट नसून, राष्ट्रनिर्माण हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कार्याचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच! केवळ राजकारण, केवळ सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान […]

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १४

(इसवी सन : १८९० ते १९०६) आपल्यामध्ये प्रेमाची, उत्साहाची, ‘भक्ती’ची कमतरता आहे का? नाही, या गोष्टी तर भारतीय प्रकृतीमध्येच रुजलेल्या आहेत, पण ‘शक्ति’च्या अभावामुळे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यांना आपण दिशा देऊ शकत नाही, एवढेच काय पण आपण त्या टिकवून देखील ठेवू शकत नाही. ‘भक्ती’ ही धगधगती ज्वाळा आहे तर, ‘शक्ती’ हे तिचे […]