Entries by श्रीअरविंद

कर्माची श्रेष्ठ-कनिष्ठता?

कर्म आराधना – ४३ आध्यात्मिक सत्याच्या दृष्टीने, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची कल्पना खचितच परकी आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिले असता, कोणतीच गोष्ट छोटी वा मोठी नसते. साहित्यिक लोकांच्या अशा कल्पना असतात की, काव्य लिहिणे हे श्रेष्ठ दर्जाचे कर्म आहे आणि चपलाबूट तयार करणे, स्वयंपाकपाणी करणे हे हलक्या दर्जाचे, किरकोळ कर्म आहे. परंतु आत्म्याच्या दृष्टीने ही सारी कर्मं समानच असतात – […]

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता

कर्म आराधना – ३९ कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पणाचा भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला एखादी व्यक्ती जर कर्म करत असताना त्यामध्ये श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची त्या व्यक्तीला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती ते कार्य करत आहे, ते […]

दैनंदिन व्यवहार आणि ईशस्मरण

कर्म आराधना – ३८ कर्म करत असताना सुरुवातीला ‘ईश्वरी उपस्थिती’चे स्मरण ठेवणे हे सोपे नसते; परंतु कर्म संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने कर्म करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआप होऊ लागेल. – श्रीअरविंद [CWSA 29 : 258-259]

कर्मसाधनेची आवश्यकता

कर्म आराधना – ३६ कर्म करत राहिल्यामुळे आंतरिक अनुभूती आणि बाह्य विकास यांच्यामध्ये संतुलन राखण्यास मदत होते; तसे न केल्यास, एकांगीपणा निर्माण होण्याची आणि प्रमाणबद्धता व संतुलनाची कमतरता वाढीस लागण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी देखील कर्मसाधना करणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी, त्यामुळेच बाह्य प्रकृतीमध्ये आणि बाह्य जीवनामध्ये, आंतरिक प्रगती आणणे साधकाला शक्य होते […]

सर्वसंग परित्याग आणि पूर्णयोग

कर्म आराधना – ३५ एखादी व्यक्ती हिमालयात निघून गेली तर, ती स्वतःला अक्रिय ध्यानासाठी (inactive meditation) सुयोग्य बनवू शकेल, पण ती जीवन जगण्यासाठी आणि ‘श्रीमाताजीं’ची सेवा करण्यासाठी काहीशी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, आणि असे झाले तर, पुढच्या जन्मामध्येही तिचे ते व्यक्तित्व तसेच कायम राहील. (हिमालयात निघून जाणे इ.) हा निव्वळ पारंपरिक कल्पनांचा प्रभाव आहे, त्यांचा […]

ईश्वरी कर्मासमान कर्म

कर्म आराधना – ३४ ‘ईश्वरा’साठी केलेले प्रत्येक कर्म हे ईश्वरी कर्मासमानच असते; ‘ईश्वरा’साठी केलेले शारीरिक श्रम हे स्वतःच्या विकासासाठी, प्रसिद्धीसाठी किंवा मानसिक समाधानासाठी केलेल्या मानसिक संस्कारांपेक्षा अधिक ईश्वरीय असतात. * कर्माचा एक मोठा लाभ हा आहे की, कर्म हे प्रकृतीची परीक्षा घेते आणि साधकाला त्याच्या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या दोषांच्या सामोरे उभे करते, अन्यथा ते दोष त्याच्या […]

दिव्य मातेचे बालक

कर्म आराधना – ३३ ‘दिव्य माते’शी तुम्ही जेव्हा पूर्णतः एकात्म पावलेले असाल, तुम्हाला आपण साधन आहोत, सेवक आहोत किंवा कार्य-कर्ते आहोत, अशी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव न राहता जर, आपण त्या दिव्य मातेच्या चेतनेचा आणि तिच्या शक्तीचा एक शाश्वत अंशभाग आहोत आणि तिचे खरेखुरे बालक आहोत अशी जाणीव होईल, तेव्हा या परिपूर्णत्वाची अंतिम अवस्था येईल. […]

ईश्वराचे साधन

कर्म आराधना – ३२ एक क्षण असा येईल जेव्हा तुम्हाला प्रकर्षाने जाणवू लागेल की, तुम्ही कार्य-कर्ते नसून फक्त एक साधन आहात. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका निकटचा होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, कोणती गोष्ट केली पाहिजे यासाठीचा खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग […]

ईश्वराचे कार्यकर्ते

कर्म आराधना – ३१ तुम्हाला ईश्वरी कार्याचे खरे कार्यकर्ते व्हायचे असेल तर, इच्छा-वासनांपासून आणि स्व-संबंधित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. ‘दिव्य शक्ती’ची सेवा करणे, ती ग्रहण करणे, तिने भरून जाणे आणि तिच्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक […]

तीन आवश्यक अटी

कर्म आराधना – ३० ‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमातून बाह्यवर्ती जीवनातील गोष्टींमध्ये कार्य करू देण्यासाठी तीन अटी आवश्यक असतात – ०१) अचंचलता, समता : घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त आणि दृढ राखणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टीने पाहणे आणि स्वतः मनाने समचित्त […]