Entries by श्रीअरविंद

व्यावहारिक कर्म आणि योग

कर्म आराधना – ५१ व्यावहारिक कर्म आपल्या योगाशी विसंगत नाही. शांती आणि ज्ञानाच्या आधारावर कर्म चालू राहिले पाहिजे. ते जाणीवपूर्वक आणि शांतचित्ताने केलेले असले पाहिजे. ज्यामध्ये खूप लोकांचा संबंध नाही, जे काम एकट्याने पूर्ण करणे शक्य आहे अशा प्रकारचे एखादे काम व्यक्ती हाती घेऊ शकते. उदाहरणार्थ, तशा प्रकारचे एखादे बौद्धिक काम किंवा एखादे शारीरिक काम […]

भौतिक वस्तुंची हाताळणी

कर्म आराधना – ५० भौतिक वस्तुंमध्ये चेतना असते. मनुष्यामध्ये किंवा प्राण्यामध्ये जशी चेतना असते आणि जसा प्राण असतो तशी चेतना किंवा तसा प्राण भौतिक वस्तुंमध्ये नसतो हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्यांच्यामध्येही गुप्त रूपाने आणि खरीखुरी चेतना असते. आणि म्हणूनच आपण भौतिक वस्तुंना योग्य तो मान दिला पाहिजे आणि आपण त्यांचा योग्य रीतीने वापर केला […]

जडभौतिकावर प्रभुत्व

कर्म आराधना – ४९ भौतिक गोष्टींमधील सुव्यवस्था, सुसंवाद आणि संघटन या बाबी कार्यक्षमता आणि परिपूर्णता यांचा आवश्यक असा भाग असतात आणि त्यामुळे, साधनाला जे कोणते कार्य दिले जाते ते करण्यासाठी ते साधन अधिक सुयोग्य बनते. * भौतिक गोष्टींना तुच्छ लेखता कामा नये – कारण त्यांच्याविना या जडभौतिक विश्वामध्ये आविष्करणच होऊ शकणार नाही. * भौतिक वस्तुंना […]

मनाच्या दोन सवयी

कर्म आराधना – ४८ कर्म करत असताना तुम्ही फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, कर्माच्या आधीही नको किंवा त्यानंतरही त्या कर्माचा विचार करू नका. जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत वळू देऊ नका. कारण ते भूतकाळाचा भाग झालेले असते आणि ते मनामध्ये पुन्हापुन्हा घोळवत ठेवणे हा शक्तीचा अपव्यय असतो. जे कर्म करायचे आहे […]

जीवनातील नित्यनूतनता

कर्म आराधना – ४७ सुव्यवस्था आणि तालबद्धता यांच्याविना भौतिक जीवन अस्तित्वात असू शकत नाही. जेव्हा ही व्यवस्था बदलली जाते तेव्हा व्यवस्थेतील बदल हा आंतरिक वृद्धीच्या अनुषंगानेच असला पाहिजे; केवळ काहीतरी वरवरची नूतनता हवी म्हणून तो बदल करता कामा नये. पृष्ठवर्ती कनिष्ठ प्राणिक प्रकृतीच्या एका विशिष्ट भागाची फक्त बदलासाठी बदल आणि नूतनतेसाठी नूतनता मिळविण्याची ही नेहमीची […]

खरी आंतरात्मिक आणि प्राणिक अवस्था

कर्म आराधना – ४६ तुम्हाला न आवडणारे काम तुम्हाला करावे लागेलच असे नाही, तर तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे (vital) चोचले पुरवण्यासारखे आणि त्याचे प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवन प्राणिक आवडी-निवडीच्या अधीन असणे, हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे तत्त्व आहे. कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे […]

कर्मामधील समत्व

कर्म आराधना – ४५ अडीअडचणींचा नाईलाजास्तव स्वीकार करणे हा कर्मयोगाचा भाग असू शकत नाही – तर घटना साहाय्यकारी असोत वा विरोधी असोत, त्या सद्भाग्यपूर्ण असोत वा दुर्भाग्यपूर्ण असोत; सौभाग्य असो अथवा दुर्भाग्य असो, प्रयत्नांना यश मिळो वा अपयश, या साऱ्या गोष्टींना स्थिर समतेने सामोरे जाणे आवश्यक असते. आवश्यक ते ते सारे करत असताना, गडबडून न […]

योगिक कर्म

कर्म आराधना – ४४ कर्म ज्या वृत्तीने आणि ज्या चेतनेनिशी केले जाते त्यानुसार ते कर्म ‘योगिक’ बनते, स्वयमेव कर्मामुळे ते कर्म योगिक किंवा अ-योगिक ठरत नाही. * फलाच्या आशेने एखादी गोष्ट करणे हे ‘योगा’च्या नियमांशी विसंगत आहे. एखादी गोष्ट योग्य आहे म्हणूनच ती केली पाहिजे किंवा ती ‘ईश्वरा’साठीच केली गेली पाहिजे, कोणत्याही फलासाठी नव्हे. – […]

कर्माची श्रेष्ठ-कनिष्ठता?

कर्म आराधना – ४३ आध्यात्मिक सत्याच्या दृष्टीने, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची कल्पना खचितच परकी आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिले असता, कोणतीच गोष्ट छोटी वा मोठी नसते. साहित्यिक लोकांच्या अशा कल्पना असतात की, काव्य लिहिणे हे श्रेष्ठ दर्जाचे कर्म आहे आणि चपलाबूट तयार करणे, स्वयंपाकपाणी करणे हे हलक्या दर्जाचे, किरकोळ कर्म आहे. परंतु आत्म्याच्या दृष्टीने ही सारी कर्मं समानच असतात – […]

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता

कर्म आराधना – ३९ कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पणाचा भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला एखादी व्यक्ती जर कर्म करत असताना त्यामध्ये श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची त्या व्यक्तीला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती ते कार्य करत आहे, ते […]