Entries by श्रीअरविंद

केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही

आध्यात्मिकता २२ मनुष्य एकदा जरी स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी संमती देऊ शकला तरी सारेकाही बदलून जाईल; परंतु त्याची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मनुष्य स्वत:च्या अपूर्णतेवर प्रेम करतो. ‘आत्मा’ हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण त्यांच्या परिपूर्ण दशेमध्ये तेच त्या […]

अज्ञानामय प्रकृतीचे रूपांतर

आध्यात्मिकता १९ ‘आध्यात्मिकता’ आंतरिक अस्तित्वाला मुक्त करते, प्रकाशित करते; मनापेक्षा उच्चतर असणाऱ्या गोष्टीशी संपर्क करण्यासाठी ती मनाला साहाय्य करते; एवढेच नव्हे तर ती, मनाची मनापासून सुटका करून घेण्यासाठीसुद्धा साहाय्य करते. आंतरिक प्रभावाद्वारे ती व्यक्तींच्या बाह्यवर्ती प्रकृतीचे शुद्धीकरण आणि उन्नयन करू शकते परंतु जोपर्यंत तिला मानवी समूहामध्ये मन या साधनाद्वारे कार्य करावे लागते, तोपर्यंत ती पृथ्वीवरील […]

,

आध्यात्मिक जीवन – एक विशाल साम्राज्य

आध्यात्मिकता १८ जे साधक परिपूर्णतेपर्यंत किंवा त्या जवळपाससुद्धा पोहोचलेले नाहीत त्यांच्या बोलण्यातले आणि वागण्यातले अंतर, त्यांचे विपरीत वर्तन तुम्ही पाहता आणि आध्यात्मिक अनुभव वगैरे असे काही नसते किंवा त्यात काही अर्थ नसतो असे तुम्ही म्हणता; परंतु त्या साधकांचे वर्तन हे तुमच्या म्हणण्यासाठी पुरावा कसा काय ठरू शकतो? एखाद्या माणसाला जेव्हा कधी कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक अनुभव […]

,

आध्यात्मिक तपस्या

आध्यात्मिकता १५ आत्म-नियमनाच्या सर्व साधनापद्धती (उदा. आहार परिमित असावा इत्यादी गोष्टी) या जर केवळ नैतिक गुणांचे पालन करायचे म्हणून आचरणात आणल्या गेल्या तर, त्यामधून आध्यात्मिक स्थिती (spiritual state) प्राप्त होईलच असे नाही. त्या जर ‘आध्यात्मिक तपस्या’ म्हणून आचरणात आणल्या गेल्या तरच त्यांचे – किमान त्यातील बहुतांशी साधनापद्धतींचे साहाय्य होऊ शकते. एखादा मनुष्य अगदी अल्प आहार […]

,

द्वंद्वातीतता आणि आध्यात्मिकता

आध्यात्मिकता १४ अध्यात्म-साधनेसाठी ‘प्रामाणिकपणा’ ही अगदी अत्यावश्यक गोष्ट असते आणि कुटिलता हा त्यामधील कायमचा अडथळा असतो. ‘सात्त्विक वृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि सज्ज असते आणि राजसिक वृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून गेलेली असते,’ असे मानले जाते. त्याच वेळी हेही खरे आहे की, ‘आध्यात्मिकता’ ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कोणती […]

,

आध्यात्मिकतेचा गाभा

आध्यात्मिकता ११ मानसिक विचार, नैतिक प्रयास, उत्तम चारित्र्य, जनहित, आत्म-त्याग, आत्म-परित्याग, परोपकार, मानवाची किंवा मनुष्यमात्राची सेवा या गोष्टींना पाश्चात्य लोक आध्यात्मिक अभीप्सेचे किंवा आध्यात्मिक सिद्धीचे शिखर मानतात. यासंबंधी लिहून झाल्यावर श्रीअरविंद या पत्रामध्ये पुढे लिहितात….. (वर उल्लेख केलेल्या गोष्टी) म्हणजे पृथ्वीवरील उपलब्धींचा जर अखेरचा शब्द असता, तर अन्य कोणत्या गोष्टींची आवश्यकताच भासली नसती. आत्म्याचा किंवा […]

,

धार्मिकता, चमत्कार आणि आध्यात्मिकता

आध्यात्मिकता १० धार्मिक माणसं ही आध्यात्मिक असतात असे लोकं मानतात पण एखादी व्यक्ती अगदी खूप धार्मिक असूनही ती आध्यात्मिक नाही, असे असू शकते. आध्यात्मिकतेची जी लोकप्रिय संकल्पना आहे त्याद्वारे, गूढविद्येच्या शक्तीचे अद्भुत विक्रम, तपस्व्यांचे विक्रम, चमत्कार, तुमच्या त्या संन्यासीबाबांची थक्क करणारी सादरीकरणे या गोष्टींना आध्यात्मिक सिद्धीचे कार्य आणि महान ‘योगी’ असण्याची लक्षणे म्हणून संबोधण्यात येते […]

,

मानवतेची सेवा आणि आध्यात्मिकता

आध्यात्मिकता ०९ आपल्या कुटुंबीयांसाठी पैसे कमावणे आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडणे; एक भला आणि नीतिसंपन्न माणूस बनणे; सुयोग्य नागरिक, देशभक्त, देशासाठी कार्यकर्ता बनणे ही गोष्ट, कोणत्यातरी दूरस्थ आणि अदृश्य ‘देवते’च्या शोधार्थ, निष्क्रियपणे ध्यानाला बसण्यापेक्षा अधिक ‘आध्यात्मिक’ आहे, असे आपल्याला अलीकडे वारंवार सांगण्यात येते. परोपकार, जनहित, मानवतेची सेवा या गोष्टींना खऱ्या आध्यात्मिक गोष्टी म्हणून मानण्यात येते. […]

,

मानवी परिपूर्णत्व आणि आध्यात्मिकता

आध्यात्मिकता ०८ तुम्ही तुमच्या पत्रामध्ये वर्णन केलेल्या परिपूर्णत्वाच्या गोष्टी या कितीही चांगल्या असल्या तरी, त्याचे वर्णन मी ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा जो खरा अर्थ आहे त्या अर्थाने करणार नाही. कारण त्यामध्ये आध्यात्मिकतेच्या सारभूत आवश्यक अशा गोष्टींचा अभाव आहे. सर्व प्रकारचे पूर्णत्व हे खरोखर चांगलेच असते, कारण या किंवा त्या स्तरावर, या किंवा त्या मर्यादेत पूर्ण आत्माविष्काराच्या […]

दिव्य जीवन

दिव्य पूर्णता ही आपल्या नेहमीच ऊर्ध्वस्थित असते. परंतु, मनुष्याची चेतना व त्याच्या कृती दिव्य बनणे आणि अंतरंगातून व बाह्यतः देखील त्याने दिव्य जीवन जगणे हाच ‘आध्यात्मिकते’चा अर्थ आहे. ‘आध्यात्मिकता’ या शब्दाला देण्यात आलेले इतर सर्व दुय्यम अर्थ म्हणजे अर्धवट चाचपडणे आहे किंवा विडंबन आहे. – श्रीअरविंद [CWSA 25 : 262-263]