Entries by श्रीअरविंद

भारतीय धर्माचे अधिष्ठान : तीन मूलभूत संकल्पना भाग (०१)

भारत – एक दर्शन १४ आपण भारतीय धार्मिक मनाच्या समन्वयी प्रवृत्तीला, सर्वसमावेशक एकतेला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. तसे केले नाही तर, भारतीय जीवनाचा आणि भारतीय संस्कृतीचा अर्थ आपल्याला सर्वार्थाने लक्षात येणार नाही. या मनाची व्यापक, लवचीक प्रवृत्ती जाणून घेतल्यानेच आपल्याला भारतीय धार्मिक मनाचा समाजावर आणि व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम झालेला आहे तो नीट समजेल. कोणी […]

उपनिषदांचे अलौकिक स्वरूप

भारत – एक दर्शन १३ उपनिषदं म्हणजे भारतीय मनाची एक परमोच्च कृती आहे आणि तशी ती असायलाही हवी कारण भारतीय मनाच्या प्रतिभेचे उच्चतम आत्माविष्करण, त्याचे सर्वांत उन्नत काव्य, विचार आणि शब्दांची महत्तर निर्मिती ही केवळ एक सामान्य दर्जाची साहित्यिक किंवा काव्यात्मक कलाकृती असता कामा नये तर, ती साहित्यकृती म्हणजे थेट आणि सखोल स्वरूपाच्या आध्यात्मिक साक्षात्काराचा […]

वैदिक शिकवण

भारत – एक दर्शन १२ वैदिक शिकवण ही मनुष्याच्या आंतरिक जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे त्या शिकवणुकीचे मोठे सामर्थ्य आहे आणि त्यामुळेच ती शिकवण नंतरच्या सर्व भारतीय तत्त्वज्ञानांचा, धर्मांचा, योगप्रणालींचा उगम ठरली. मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून […]

‘वैदिक’ धर्मातील देव-संकल्पना

भारत – एक दर्शन ११ (हिंदुधर्मातील देवदेवतांच्या वैपुल्याबद्दल अन्य धर्मांमध्ये काहीसा तिरकस सूर लावला जातो. त्या देवदेवतांचे नेमके मर्म काय, हेच श्रीअरविंद येथे एक प्रकारे स्पष्ट करत असल्याचे दिसते.) ब्रह्मांडातील देवदेवतांच्या आंतरात्मिक गौरवाच्या विस्तारीकरणानिशी आंतरिक ‘वैदिक’ धर्माचा प्रारंभ झाला. जगतांची एक श्रेणी आहे आणि या विश्वामध्ये अस्तित्वाच्या पातळ्यांची एक चढती श्रेणी आहे अशी ‘वैदिक धर्मा’ची […]

अत्यंत महत्त्वाचे कार्य

भारत – एक दर्शन १० ‘भारतीयत्व’ ही केवळ एक भावना आहे, परंतु अजूनही त्या विषयीचे ज्ञान नाहीये. काही निश्चित अशी धारणा वा सखोल मर्मदृष्टी नाहीये. अजून आपण आपल्या स्वत:ला जाणून घ्यायचे आहे, आपण कोण होतो, कोण आहोत आणि कोण असणार आहोत; आपण भूतकाळात काय केले आहे आणि भविष्यामध्ये काय करण्याची क्षमता आपण बाळगतो, आपला इतिहास […]

भारताच्या विकसनाचा इतिहास

भारत – एक दर्शन ०९ (भारताची आध्यात्मिकता आणि भारताची बहुप्रसवा सर्जनशीलता या दोन गोष्टीमध्येच ‘भारताचा आत्मा’ किंवा ‘भारतीयत्व’ आहे असे नाही. तर अजून तिसरी एक गोष्ट आहे. त्यासंबंधी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.) ‘प्रखर बुद्धिमत्ता’ ही प्राचीन भारतीय स्वभावाची ताकद होती. ती एकाच वेळी कठोर आणि समृद्ध, मजबूत आणि सूक्ष्म, बलशाली आणि नाजूक होती तसेच ती […]

भारतीय मनाला लागलेला शोध

भारत – एक दर्शन ०८ भारताला मानवाच्या पलीकडे असलेल्या अगणित देवदेवता दिसल्या, या देवदेवतांच्या अतीत असणारा ‘ईश्वर’ दिसला आणि त्या ‘ईश्वरा’च्या अतीत मानवाची स्वतःची अनिर्वचनीय अशी अनंतता दिसली. भारताला असे दिसून आले की, आपल्या जीवनाच्या पलीकडे जीवनाच्या अनेक श्रेणी आहेत, तसेच आपल्या सद्यकालीन मनाच्या अतीत असलेल्या मनाच्या अनेक श्रेणी त्याला दिसल्या आणि या साऱ्याच्या अतीत […]

भारताची बहुप्रसवा सर्जनशीलता

भारत – एक दर्शन ०७ ज्याप्रमाणे कोणताही आधार नसताना, स्वप्नवत जादुई ढगांमधून गिरीशिखरं उदयाला येऊ शकत नाहीत त्याप्रमाणेच ‘आध्यात्मिकता’ ही पृथ्वीवर काहीही नसताना, एखाद्या पोकळीमध्ये बहरू शकत नाही. आपण जेव्हा भारताच्या गतकाळाकडे पाहतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिकतेच्या खालोखाल आपल्या नजरेत भरते ती त्याची विस्मयकारक प्राणशक्ती, त्याची जीवनाची अक्षय शक्ती, जीवनाचा आनंद, आणि अकल्पनीय अशी बहुप्रसवा सर्जनशीलता! […]

भारतमातेचे देह-चतुष्टय

भारत – एक दर्शन ०६ (युरोपियन लोकांची देशाबद्दलची संकल्पना कशी संकुचित आहे, हे सांगून झाल्यावर, भारतीय मनाची देशाकडे पाहण्याची दृष्टी किती सखोल आहे, हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.) देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह असतो, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल. माणसांच्या समूहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा […]

भारतीय मनाची गुरूकिल्ली

भारत – एक दर्शन ०४ ‘आध्यात्मिकता’ ही भारतीय मनाची गुरूकिल्ली आहे; भारतीय मनामध्ये अनंततेची जाणीव उपजतच आहे. जीवनाच्या बाह्यवर्ती गोष्टींची जी शक्ती असते केवळ त्यामध्ये जीवन परिपूर्णत्वाने जगता येत नाही, जीवन योग्य प्रकारे समजावून घ्यायचे तर ते केवळ त्या प्रकाशामध्ये समजावून घेता येत नाही, याची जाण भारताला प्रारंभापासूनच होती. आणि ही अंतर्दृष्टी भारताने अगदी तर्कबुद्धीच्या […]