Entries by श्रीअरविंद

ध्यान आणि जागृतावस्था

साधना, योग आणि रूपांतरण – ५१ एकाग्रता आवश्यक असते. ध्यानाद्वारे तुम्ही तुमचा अंतरात्मा जागृत करत असता; तर तुमच्या जीवनामध्ये, कर्मामध्ये आणि तुमच्या बाह्यवर्ती चेतनेमध्ये एकाग्रता साधल्याने, तुम्ही तुमचे बाह्यवर्ती अस्तित्वसुद्धा (मन, प्राण आणि शरीर) ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शांती’ ग्रहण करण्यास सुपात्र बनवत असता. * जाग्रत चेतनेमध्येच सर्व गोष्टींचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. परंतु आंतरिक […]

ध्यान आणि कर्म यांतील समतोल

साधना, योग आणि रूपांतरण – ४९ तुम्ही मनाने अगदी खंबीर नसाल तर, तुम्ही सदासर्वकाळ किंवा दिवसातील बराचसा काळ ध्यानामध्ये व्यतीत करता कामा नये. कारण मग तुम्हाला पूर्णतः आंतरिक जगतामध्ये राहायची सवय लागू शकते आणि त्यामुळे तुमचा बाह्य वास्तवांशी असणारा संपर्क तुटू शकतो. यामुळे एककल्ली आणि विसंवादी वाटचाल होते आणि त्यामुळे संतुलन ढळण्याची शक्यता असते. ध्यान […]

ध्यानाची वेळ

साधना, योग आणि रूपांतरण – ४७ ध्यानासाठी एक ठरावीक वेळ निश्चित करता येणे शक्य असेल आणि ती नेहमी पाळणे शक्य असेल तर ते नक्कीच इष्ट ठरेल. * तुमची चेतना जागृत ठेवायची असेल तर तुम्ही ध्यानासाठी एक ठरावीक वेळ राखून ठेवली पाहिजे आणि श्रीमाताजींचे स्मरण करून, आमच्या संपर्कात राहिले पाहिजे. ध्यानामध्ये काही विघ्न आले तर, तुम्हाला […]

आसनस्थ स्थिती

साधना, योग आणि रूपांतरण – ४६ निश्चल स्तब्ध बसणे ही एकाग्रतापूर्ण ध्यानासाठी अगदी स्वाभाविक अशी आसनस्थिती असते तर चालणे आणि उभे राहणे या, ऊर्जा वितरणासाठी आणि मनाच्या क्रियाकलापांसाठी अनुकूल अशा सक्रिय स्थिती असतात. व्यक्तीने जर स्थायी शांती आणि चेतनेची नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून घेतली असेल तर तेव्हाच व्यक्तीला चालत असताना किंवा अन्य काही करत असताना […]

आपले खरे अस्तित्व

साधना, योग आणि रूपांतरण – ४५ सुरुवाती सुरुवातीला एकाग्रता करण्यासाठी, ध्यानाला बसण्यासाठी स्थिरता आणि शांतीपूर्ण अवस्था असणेच आवश्यक असते हे अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा अशी अवस्था असणे आणि ध्यान करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणे ही गोष्ट महत्त्वाची असते. परंतु अन्य वेळी मात्र त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला फक्त एक प्रकारची मानसिक अविचलता […]

ध्यानासाठी आवश्यक आंतरिक व बाह्य परिस्थिती

साधना, योग आणि रूपांतरण – ४३ साधक : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती? श्रीअरविंद : मूलभूत अशी कोणतीही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा (solitude and seclusion ) असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु […]

ध्यानाचा उपयोग

साधना, योग आणि रूपांतरण – ४१ (ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…) ‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे […]

ध्यानाची उद्दिष्टे

साधना, योग आणि रूपांतरण – ४० (ध्यानाची उद्दिष्टे काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा पूर्वार्ध…) कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर विचारांची एकाग्रतापूर्वक मालिका या स्वरूपात ‘ध्यान’ (meditation) करायला सांगितले जाते; तर कधीकधी एका विशिष्ट प्रतिमेवर, शब्दावर किंवा संकल्पनेवर मनाची अनन्य एकाग्रता स्थिर करण्यास सांगण्यात येते. येथे ‘ध्यान’ म्हणण्यापेक्षा स्थिर असे ‘निदिध्यासन’ […]

विश्वगत ईश्वराचे दर्शन

साधना, योग आणि रूपांतरण – ३९ (पूर्णयोगांतर्गत साक्षात्कारामध्ये, स्वत:मधील ईश्वराचे दर्शन, विश्वगत ईश्वराचे दर्शन, विश्वातीत ईश्वराचे दर्शन या तीन साक्षात्कारांचा समावेश होतो. त्यातील ‘विश्वगत ईश्वराचे दर्शन’ घेण्याचा मार्ग श्रीअरविंद येथे सांगत आहेत. श्रीअरविंदलिखित Synthesis of Yoga या पुस्तकामधील एक उतारा आणि नंतर त्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण) …ही एकाग्रता ‘संकल्पने’वर आधारित असते. कारण या ‘संकल्पने’च्या माध्यमातून मनोमय […]

सर्वं खल्विदं ब्रह्म

साधना, योग आणि रूपांतरण – ३८ साधक : ध्यानाची उद्दिष्टे काय असली पाहिजेत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात? श्रीअरविंद : जी संकल्पना तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असेल ती! परंतु जर तुम्ही मला नेमके उत्तर विचारत असाल, तर मी सांगेन की, ध्यानासाठी किंवा निदिध्यासनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे सर्वांतर्यामी […]