Entries by श्रीअरविंद

साधनेतील चढउतार

साधना, योग आणि रूपांतरण – ६१ (साधनेमध्ये काही कालखंड प्रगतीचे तर काही कालखंड नीरसपणे जात आहेत अशी तक्रार एका साधकाने केलेले दिसते. त्याला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…) तुम्ही ज्या चढ-उतारांविषयी तक्रार करत आहात, त्याचे कारण असे की, चेतनेचे स्वरूपच तशा प्रकारचे असते; म्हणजे, काही काळ जागे राहिल्यानंतर थोडी निद्रेची गरज भासते. बरेचदा सुरुवातीला सजग अवस्था […]

दोलायमान स्थिती

साधना, योग आणि रूपांतरण – ६० (ध्यानामध्ये प्राप्त झालेली) चांगली अवस्था कायम टिकून राहत नाही ही बऱ्यापैकी सार्वत्रिकपणे आढळणारी घटना आहे. चांगली अवस्था येणे व निघून जाणे अशी दोलायमान स्थिती नेहमीच आढळून येते. जो बदल होऊ घातलेला आहे तो जोपर्यंत स्वतः स्थिर होत नाही, तोपर्यंत अशी ये-जा चालूच राहते. हे दोन कारणांमुळे घडून येते. प्राण […]

नामजपाचा अभ्यास

साधना, योग आणि रूपांतरण – ५९ साधक : जपाबद्दलची माझी जुनीच प्रतिक्रिया पुन्हा एकदा उफाळून आली आहे, त्याबद्दल मला वाईट वाटत आहे. नामजपाचे परिणाम दिसून यावेत म्हणून कदाचित माझे मन त्याचा अतिरेक करत असावे. श्रीअरविंद : व्यक्तीने जपाचा अर्थ समजून घेतला, आणि त्या अर्थानिशी नामजप केला, तसेच त्या नामजपामधून ज्या ‘देवते’चा बोध होतो त्याविषयीचे एक […]

एकाग्रतेची विविध साधने

साधना, योग आणि रूपांतरण – ५७ (कालच्या भागामध्ये आपण मन निश्चल-नीरव करण्याच्या विविध पद्धती समजावून घेतल्या. विचारांना अनुमती न देणे, विचारांकडे साक्षी पुरुषाप्रमाणे अलिप्तपणे पाहणे आणि मनात येणाऱ्या विचारांना ते आत प्रवेश करण्यापूर्वीच अडविणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करूनही, जर मन निश्चल-नीरव झाले नाही तर काय करावे, असा प्रश्न येथे साधकाने विचारला असावा असे दिसते. त्यास […]

मन शांत करण्याचे मार्ग

साधना, योग आणि रूपांतरण – ५६ ध्यानाला बसल्यावर मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येऊन गर्दी करतात, ही जर तुमची अडचण असेल तर ती अडचण विरोधी शक्तींमुळे येत नाही, तर मानवी मनाच्या सर्वसाधारण प्रकृतीमुळे ती अडचण येते. सर्वच साधकांना ही अडचण येते आणि काहींच्या बाबतीत तर ती खूप दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. त्यापासून सुटका करून घेण्याचे अनेक […]

मनाची खळबळ

साधना, योग आणि रूपांतरण – ५५ किरकोळ बारीकसारीक विचार मनामध्ये सातत्याने घोळत राहणे हे यांत्रिक मनाचे स्वरूप असते, मनाची संवेदनशीलता हे त्याचे कारण नसते. तुमच्या मनाचे इतर भाग हे अधिक शांत आणि नियंत्रणाखाली आले आहेत, आणि त्यामुळेच यांत्रिक मनाची ही खळबळ तुम्हाला अधिक ठळकपणे लक्षात येत आहे आणि ती मनाचा अधिकांश प्रदेशदेखील व्याप्त करत आहे. […]

ध्यानातून बाहेर येताना…

साधना, योग आणि रूपांतरण – ५३ तुम्ही अंतरंगामध्ये खोलवर आणि अविचल स्थितीमध्ये प्रवेश केलेला असतो. पण जर व्यक्ती अशा स्थितीमधून अगदी अचानकपणे बाहेर सामान्य चेतनेमध्ये आली तर, तुम्ही म्हणता तसा मज्जातंतुला किंचितसा धक्का बसू शकतो किंवा थोड्या वेळासाठी हृदयाची धडधड वाढू शकते. आंतरिक स्थितीमधून डोळे उघडून बाहेर येताना, काही क्षणांसाठी शांत-स्थिर, अविचल राहणे हे नेहमीच […]

ध्यान आणि जागृतावस्था

साधना, योग आणि रूपांतरण – ५१ एकाग्रता आवश्यक असते. ध्यानाद्वारे तुम्ही तुमचा अंतरात्मा जागृत करत असता; तर तुमच्या जीवनामध्ये, कर्मामध्ये आणि तुमच्या बाह्यवर्ती चेतनेमध्ये एकाग्रता साधल्याने, तुम्ही तुमचे बाह्यवर्ती अस्तित्वसुद्धा (मन, प्राण आणि शरीर) ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शांती’ ग्रहण करण्यास सुपात्र बनवत असता. * जाग्रत चेतनेमध्येच सर्व गोष्टींचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. परंतु आंतरिक […]

ध्यान आणि कर्म यांतील समतोल

साधना, योग आणि रूपांतरण – ४९ तुम्ही मनाने अगदी खंबीर नसाल तर, तुम्ही सदासर्वकाळ किंवा दिवसातील बराचसा काळ ध्यानामध्ये व्यतीत करता कामा नये. कारण मग तुम्हाला पूर्णतः आंतरिक जगतामध्ये राहायची सवय लागू शकते आणि त्यामुळे तुमचा बाह्य वास्तवांशी असणारा संपर्क तुटू शकतो. यामुळे एककल्ली आणि विसंवादी वाटचाल होते आणि त्यामुळे संतुलन ढळण्याची शक्यता असते. ध्यान […]

ध्यानाची वेळ

साधना, योग आणि रूपांतरण – ४७ ध्यानासाठी एक ठरावीक वेळ निश्चित करता येणे शक्य असेल आणि ती नेहमी पाळणे शक्य असेल तर ते नक्कीच इष्ट ठरेल. * तुमची चेतना जागृत ठेवायची असेल तर तुम्ही ध्यानासाठी एक ठरावीक वेळ राखून ठेवली पाहिजे आणि श्रीमाताजींचे स्मरण करून, आमच्या संपर्कात राहिले पाहिजे. ध्यानामध्ये काही विघ्न आले तर, तुम्हाला […]