Entries by श्रीअरविंद

चेतनेची अंतराभिमुख प्रक्रिया

साधना, योग आणि रूपांतरण – ८४ (आरोहण आणि अवरोहण प्रक्रियेचे परिणाम काय घडून येतात हे कालच्या भागात आपण पाहिले.) एकदा हे अवरोहण स्वाभाविक झाले की, श्रीमाताजींची ‘दिव्य शक्ती’ आणि त्यांची ‘ऊर्जा’ कार्य करू लागते, आणि आता ती केवळ वरून किंवा पडद्याआडूनच कार्य करते असे नव्हे तर ती खुद्द ‘आधारा’मध्येच सचेतरितीने कार्यरत होते आणि आधाराच्या अडीअडचणी, […]

प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन

साधना, योग आणि रूपांतरण – ८३ (साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.) आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे […]

आंतरिक जागृतीचा अनुभव

साधना, योग आणि रूपांतरण – ८२ (बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांमधील आवरण भेदण्याच्या प्रक्रियेसंबंधी आपण कालच्या भागात माहिती घेतली.) ही आंतरिक प्रक्रिया अनेक प्रकारे घडू शकते. आणि संपूर्णपणे बुडी घेण्याच्या ज्या सर्व खुणा असतात त्या सर्व एकत्रितपणे आढळून येतील असा एक व्यामिश्र अनुभवदेखील कधीकधी येऊ शकतो. आपण कोठेतरी आतमध्ये जात आहोत किंवा खूप खोलवर […]

योगाचा अर्थ

साधना, योग आणि रूपांतरण – ८१ आंतरिक पुरुष आणि बाह्यवर्ती चेतना यांच्यातील आवरण भेदणे ही योगसाधनेमधील एक निर्णायक प्रक्रिया असते. ‘ईश्वरा’शी ऐक्य हा ‘योगा’चा अर्थ आहे, त्याचप्रमाणे, प्रथम तुमच्या आंतरिक आत्म्याप्रति आणि नंतर तुमच्या उच्चतर आत्म्याप्रति जागृत होणे, म्हणजे अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख होणे असा देखील ‘योगा’चा अर्थ आहे. वास्तविक, या जागृतीमुळे आणि आंतरिक पुरुष अग्रस्थानी […]

चेतनायुक्त समाधी

साधना, योग आणि रूपांतरण – ७८ साधक : समाधीमध्ये काही गोष्टी करणे सोपे जात असेल तर समाधी ही पूर्णयोगासाठीसुद्धा एक अतिशय चांगली अवस्था नाही का? काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा समाधीसंबंधी बोललो होतो तेव्हा तुम्ही असे म्हटल्याचे मला स्मरते की, “समाधीची आवश्यकता नाही तर एका नवीन चेतनेची आवश्यकता आहे.” श्रीअरविंद : निश्चितच (समाधी ही चांगली अवस्था […]

पूर्णयोगाचे वैशिष्ट्य

साधना, योग आणि रूपांतरण – ७७ [श्रीअरविंद येथे अवरोहण (descent) प्रक्रियेच्या संदर्भात काही सांगत आहेत.] पूर्वीचे योग हे प्रामुख्याने अनुभवांच्या मनो-आध्यात्मिक अतींद्रिय श्रेणींपुरतेच मर्यादित असत. त्यामध्ये उच्चतर अनुभव हे स्थिर मनामध्ये किंवा एकाग्रचित्त हृदयामध्ये एक प्रकारे झिरपत येतात किंवा प्रतिबिंबित होतात. या अनुभवाचे क्षेत्र हे ब्रह्मरंध्रापासून खाली असते. साधक (ब्रह्मरंध्राच्या) वर फक्त समाधी अवस्थेमध्येच जात […]

पूर्णयोगाचे उद्दिष्ट

साधना, योग आणि रूपांतरण – ७६ (कधीकधी) असे होते की साधकांना अवरोहणाचा अनुभव येतो; पण त्यांना हे ‘अवरोहण’ (descent) आहे हे लक्षात येत नाही. कारण त्यांना केवळ त्याच्या परिणामाचीच जाणीव होते. प्रचलित योग आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही. अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य झाल्याचे जाणवते, परंतु त्यांना मस्तक-शिखराहूनही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याचप्रमाणे प्रचलित […]

समाहित अवस्था

साधना, योग आणि रूपांतरण – ७५ निश्चल – नीरवतेचे (silence) ‘अवरोहण’ ही गोष्ट मी इतर योग-प्रणालींमध्ये ऐकलेली नाही; इतर योगांमध्ये मन निश्चल-नीरवतेमध्ये ‘प्रविष्ट होणे’ हा भाग आढळून येतो. पण तरीदेखील मी जेव्हापासून आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) यांविषयी लिहीत आहे तेव्हापासूनच मला अनेक ठिकाणाहून असे सांगितले जात आहे की, (मी सांगत आहे त्या) या योगामध्ये […]

जाग्रतावस्थेतील साक्षात्कार

साधना, योग आणि रूपांतरण – ७४ (एका साधकाने ‘ध्याना’मध्ये त्याला जो साक्षात्कार झाला त्यासंबंधी श्रीअरविंद यांना लिहून कळविले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…) वास्तविक, हा साक्षात्कार जाग्रतावस्थेमध्ये होणे आवश्यक आहे आणि तो जीवनाची वास्तविकता व्हावी यासाठी टिकून राहणेदेखील आवश्यक आहे. केवळ समाधी अवस्थेमध्येच जर त्याचा अनुभव आला तर तो अतिचेतन (superconscient) […]

समाधीचा अनुभव

साधना, योग आणि रूपांतरण – ७३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) चेतना अंतरंगामध्ये प्रविष्ट झाल्याचा तुम्हाला आलेला हा अनुभव म्हणजे ज्याला सामान्यत: ‘समाधी’ असे संबोधले जाते तो अनुभव होता. वास्तविक त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे मन आणि प्राणामध्ये (तुम्हाला) आलेला निश्चल-नीरवतेचा अनुभव, की जी नीरवता अगदी शरीरापर्यंत पूर्णपणे विस्तारित झाली होती. निश्चल-नीरवतेची (silence) आणि शांतीची (peace) क्षमता […]