Entries by श्रीअरविंद

योग म्हणजे काय?

साधना, योग आणि रूपांतरण – १२० ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे म्हणजे ‘योग’. माणसाच्या अंतरंगात आणि बाहेर असणाऱ्या, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ‘ईश्वरा’शी योगी स्वतःचे थेट नाते प्रस्थापित करतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ‘ईश्वरा’चे सामर्थ्य प्रवाहित करण्याची तो एक वाहिनी (channel) बनतो. मग ते शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या […]

साधना, योग आणि रूपांतरण – ११९

साधना, योग आणि रूपांतरण – ११९ (श्री अरविंद एका साधकाला पत्रामध्ये लिहीत आहेत….) तुम्ही कार्यासाठी (ईश्वरी) ‘शक्ती’चा उपयोग करून घेतलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या ‘शक्ती’चे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब तितकीशी महत्त्वाची नसते; तर ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले गेले जाते तो […]

चिंता आणि कर्मामधील चुका

साधना, योग आणि रूपांतरण – ११६ तुम्ही सतत मनामध्ये कोणत्या तरी गोष्टींबाबत चिंता करत असता, विचार करत असता की, “हे बरोबर नाही, माझ्यातील किंवा माझ्या कामातील ही गोष्ट चुकीची आहे,” आणि परिणामतः “मी कुचकामी आहे, मी वाईट आहे, माझे काहीच होऊ शकणार नाही.” असा विचार तुम्ही सतत करत राहता आणि त्यातूनच, त्याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला […]

साधनेचे महान रहस्य

साधना, योग आणि रूपांतरण – ११५ (श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) तुम्हाला अजून जरी सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका. कोणतेही काम करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे आणि त्याला ते अर्पण करणे आणि ते संपल्यावर (‘ईश्वरा’प्रति) कृतज्ञता व्यक्त करणे हे (तुमच्या) सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा काम […]

योगयुक्त कर्म

साधना, योग आणि रूपांतरण – ११४ ‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच नेहमी कृती करण्यास तुम्ही शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये. * योगसाधनेमुळे चेतना विकसित झाली असेल तर, व्यक्ती अभीप्साही बाळगू […]

‘ईश्वरा’साठी केलेले कर्म

साधना, योग आणि रूपांतरण – ११३ माणसं सहसा प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती वा यश किंवा पद वा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याचा आनंद मिळावा यासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि त्यामध्ये ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि […]

कर्मामधील उन्मुखता

साधना, योग आणि रूपांतरण – ११२ चेतनेमधील उन्मुखतेप्रमाणेच कर्मामध्येही उन्मुखता असते. ध्यानाच्या वेळी तुमच्या चेतनेमध्ये जी ‘शक्ती’ कार्य करत असते आणि तुम्ही जेव्हा तिच्याप्रत उन्मुख, खुले होता तेव्हा ती ज्याप्रमाणे शंकांचे आणि गोंधळाचे ढग दूर पळवून लावते अगदी त्याचप्रमाणे ती ‘शक्ती’ तुमच्या कृतीदेखील हाती घेऊ शकते. आणि त्याद्वारे ती तुम्हाला तुमच्यामधील दोषांची जाणीवच करून देऊ […]

कर्मातील यशापयश

साधना, योग आणि रूपांतरण – १११ साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा-वासना यांच्यावर मात करण्याची आणि संपूर्ण समर्पण प्राप्त करून घेण्याची केवळ साधने असतात. जोपर्यंत व्यक्ती यशप्राप्तीवर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि हे असे आहे, हे दाखवून देण्यासाठी तसेच […]

…अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो.

साधना, योग आणि रूपांतरण – ११० अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा […]

शुद्धिकारक कर्म

साधना, योग आणि रूपांतरण – १०९ जे कर्म कोणत्याही वैयक्तिक हेतुविना, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणताही गर्व न बाळगता किंवा असभ्य हेकेखोरपणा न करता केले जाते किंवा कोणत्याही पदासाठी वा प्रतिष्ठेसाठी दावा […]