Entries by श्रीअरविंद

साधना, योग आणि रूपांतरण – १४१

साधना, योग आणि रूपांतरण – १४१ (कर्मव्यवहार करत असताना, वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. तेव्हा कर्मामधील सुसंवादपूर्ण वातावरणासाठी आणि पर्यायाने कार्यसिद्धीसाठी कधीकधी स्वतःच्या स्वभावालाही मुरड घालावी लागते, त्याला वळण लावावे लागते हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.) नेहमीच दोन्हीही बाजूंनी काही ना काही दोष असतात आणि मग त्याचे पर्यवसान हे विसंवादामध्ये होत असते. […]

साधना, योग आणि रूपांतरण – १४०

साधना, योग आणि रूपांतरण – १४० मी तुम्हाला ही गोष्ट यापूर्वीदेखील सांगितलेली आहे की, कोणतेही काम असो, अभ्यास असो किंवा योगामधील आंतरिक प्रगती असो, या सर्व बाबतीत, तुम्हाला जर परिपूर्णत्व हवे असेल तर त्यासाठी एकच समान गोष्ट आवश्यक असते आणि ती म्हणजे, मनाची अविचलता (quietude), ‘दिव्य शक्ती’विषयी जागरुकता, तिच्याप्रति उन्मुखता आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करण्यास […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३९

साधना, योग आणि रूपांतरण – १३९ (ईश्वरी कार्याचे साधन झालेल्या साधकामध्ये ‘दिव्य शक्ती’ अवतरित होऊ लागते, त्याला स्वतःमध्ये एक प्रकारची विशेष ऊर्जा जाणवू लागते. त्या ऊर्जेचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी श्रीअरविंद येथे मार्गदर्शन करत आहेत.) एक ‘दिव्य शक्ती’ येते आणि ती तुम्हाला कार्यप्रवृत्त करते आणि ही गोष्टदेखील आध्यात्मिक जीवनाच्या इतर सर्व गोष्टींइतकीच अस्सल असते. ती […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३८

साधना, योग आणि रूपांतरण – १३८ जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा अतिश्रम करू नका; विश्रांती घ्या. तेव्हा फक्त सामान्य जीवनव्यवहार चालू ठेवा. अस्वस्थपणे, हे नाही तर ते, असे सारखे काहीतरी करत राहणे हा थकवा दूर करण्याचा उपाय नव्हे. जेव्हा शीणल्याची, दमल्याची जाणीव होते तेव्हा अंतरंगामध्ये आणि बाह्यतःसुद्धा अविचल, स्वस्थ (quiet) राहणे गरजेचे असते. (वास्तविक) नेहमीच […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३७

साधना, योग आणि रूपांतरण – १३७ एक संकल्पना अशी आहे की, अगदी सामान्य जीवनामध्ये, व्यक्ती जे जे काही करत असते त्याचे श्रेय तिचा अहंकार घेत असला तरी, (वास्तविक) व्यक्ती ही ‘वैश्विक ऊर्जे’च्या हातातील केवळ एक साधन असते. योगामध्ये अशी संकल्पना आहे की, योग्य रीतीने (ग्रहणशील, उन्मुख स्थितीत) अक्रिय (passive) राहिल्यामुळे, व्यक्ती स्वतःच्या सीमित ‘स्व’पेक्षा अधिक […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३६

साधना, योग आणि रूपांतरण – १३६ ‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमाद्वारे बाह्य जीवनव्यवहारामध्ये कार्य करता यावे यासाठी तुमच्यामध्ये खालील तीन गोष्टी असणे आवश्यक असते. ०१) ‘अविचलता, समता’ – म्हणजे घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त व दृढ ठेवणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टिकोनातून […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३५

साधना, योग आणि रूपांतरण – १३५ एखादी कृती योग्य आहे की अयोग्य याविषयी तुम्ही सजग होऊ इच्छित असाल आणि तशी आस बाळगत असाल तर, ती गोष्ट खालील मार्गांपैकी कोणत्या तरी एका मार्गाने घडून येते – १) तुमच्या हालचालींकडे साक्षित्वाने पाहण्याची एक क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते किंवा तशी सवय तुम्हाला लागते, ज्यामुळे तुम्ही, तुम्हाला कृती करण्यास […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३४

साधना, योग आणि रूपांतरण – १३४ (कर्म करत असताना कधी एकदम उल्हसित, उत्साही वाटते तर कधी शांत वाटते, हे असे का होत असावे असे एका साधकाने विचारले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…) कर्म करत असताना, तुमच्या ज्या मनोवस्था असतात त्या दोन मनोवस्थांच्या (moods) परिणामांमध्ये फरक दिसून येतो; याचे कारण असे की, […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३३

साधना, योग आणि रूपांतरण – १३३ तुम्ही कर्म करत असतानाच फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, त्याचा विचार आधीही करू नका किंवा ते कर्म पूर्ण झाल्यानंतरही करू नका. जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत फिरू देऊ नका. कारण ते कर्म भूतकाळाचा भाग झालेले असते आणि त्याचा पुनःपुन्हा विचार करणे हा शक्तीचा अपव्यय असतो. […]

साधना, योग आणि रूपांतरण – १३२

साधना, योग आणि रूपांतरण – १३२ तुम्हाला न आवडणारे काम तुम्ही केलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे चोचले पुरविण्यासारखे आणि त्याचे तुमच्या प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवनव्यवहारांवर आवडी-निवडीचे प्राबल्य असणे हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे लक्षण असते. कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे […]