Entries by श्रीअरविंद

साधना, योग आणि रूपांतरण – २०९

साधना, योग आणि रूपांतरण – २०९ मनाला योग्य दृष्टी देऊन, प्राणिक आवेग व भावना यांना योग्य वळण लावून, आणि शारीरिक हालचालींना योग्य वळण लावून तसेच शरीराला योग्य सवयी लावून, कनिष्ठ प्रकृतीचे परिवर्तन घडविणे म्हणजे आंतरात्मिकीकरण (Psychisation). वरील सर्व गोष्टींना योग्य वळण लावणे म्हणजे त्या सर्व गोष्टी एका ‘ईश्ववरा’कडेच वळविणे, तसेच या सर्व गोष्टी प्रेम, भक्ती […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०८

साधना, योग आणि रूपांतरण – २०८ चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा अग्रस्थानी येतो तेव्हा सारे काही आनंदमय होऊन जाते. वस्तुमात्रांकडे पाहण्याची योग्य दृष्टी, योग्य दृष्टिकोन प्राप्त होतो. अर्थात एक प्रकारे, हा चैत्य पुरुष म्हणजे तोच ‘स्व’ असतो की, जो त्याचे विविध घटक (मन, प्राण, शरीर) अग्रभागी ठेवत असतो. परंतु जेव्हा हे विविध घटक चैत्य पुरुषाच्या […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०७

साधना, योग आणि रूपांतरण – २०७ श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रति आत्मार्पण हे चैत्य पुरुष (psychic being) खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्तीमध्ये वाढ झाली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे. श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची जाणीव होणे किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ करत आहेत याचे स्मरण होणे ही […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०६

साधना, योग आणि रूपांतरण – २०६ (आंतरात्मिक रूपांतरणासाठी ‘चैत्य पुरुष’ खुला होऊन तो अग्रभागी येणे आवश्यक असते. तो संपूर्णपणे प्रकट व्हावा यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे श्रीअरविंदांनी येथे सांगितले आहे.) साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या गुंतागुंतीतून साधक जेव्हा मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रति साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करण्यास सक्षम होईल तेव्हाच त्या साधकातील ‘चैत्य […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०५

साधना, योग आणि रूपांतरण – २०५ पूर्णयोगाच्या परिभाषेत चैत्य (psychic) याचा अर्थ प्रकृतीमधील आत्मतत्त्व, आत्म्याचा अंश असा होतो. मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे स्थित असणारे ते शुद्ध चैत्य किंवा दिव्य केंद्र असते; (हा आत्मा म्हणजे अहं नव्हे.) परंतु आपल्याला त्याविषयी अगदी पुसटशीच जाणीव असते. हे चैत्य अस्तित्व म्हणजे ‘ईश्वरा’चा अंश असते. आणि हे अस्तित्व […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०४

साधना, योग आणि रूपांतरण – २०४ आत्मा, चैत्य पुरुष हा ईश्वरी ‘सत्या’च्या थेट संपर्कात असतो परंतु मनुष्यामध्ये मात्र तो मन, प्राण आणि शारीर प्रकृती यांच्यामुळे झाकलेला असतो. मनुष्य योगसाधना करून मन व तर्कबुद्धीच्या द्वारे ज्ञानप्रकाश मिळवू शकतो; प्राणामध्ये तो शक्तीवर विजय प्राप्त करून घेऊ शकतो, सर्व प्रकारच्या अनुभवांचा आनंद उपभोगू शकतो. तो अगदी आश्चर्यकारक अशा […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०३

साधना, योग आणि रूपांतरण – २०३ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयामध्ये तुम्ही चैत्य अग्नी विकसित केला पाहिजे आणि चैत्य पुरुष अग्रस्थानी यावा ही अभीप्सा तुमच्या साधनेची अग्रणी झाली पाहिजे. जेव्हा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येईल तेव्हा, तो तुम्हाला (तुमच्या) ‘अहंकाराच्या अलक्षित गाठी’ दाखवून देईल आणि त्या सैल करेल किंवा चैत्य अग्नीमध्ये त्या […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०२

साधना, योग आणि रूपांतरण – २०२ आंतरात्मिक रूपांतरण (psychic transformation) हे दोन रूपांतरणांपैकी पहिले आवश्यतक असणारे रूपांतरण असते. तुमच्यामध्ये जर आंतरात्मिक रूपांतर झाले तर ते दुसऱ्या रूपांतरणास अतिशय साहाय्यक ठरते. हे दुसरे रूपांतरण म्हणजे सामान्य मानवी चेतनेचे उच्चतर आध्यात्मिक चेतनेमध्ये होणारे रूपांतरण. आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation) होण्यापूर्वी आंतरात्मिक रूपांतरण झाले नाही तर व्यक्तीचा प्रवास एकतर […]

साधना, योग आणि रूपांतरण – २०१

साधना, योग आणि रूपांतरण – २०१ व्यक्ती जर नेहमीच उच्चतर चेतनेमध्ये राहू शकली तर, ते अधिक चांगले असते. परंतु मग व्यक्ती नेहमीच तिथे का राहत नाही? कारण निम्नतर चेतना ही अजूनही प्रकृतीचा भाग आहे आणि ती चेतना तुम्हाला स्वतःच्या दिशेने खाली खेचत राहते. पण समजा निम्नतर चेतनाच रूपांतरित झाली तर, ती एक प्रकारे उच्चतर चेतनेचाच […]

साधना, योग आणि रूपांतरण – २००

साधना, योग आणि रूपांतरण – २०० आमचा ‘योग’ हा रूपांतरणाचा ‘योग’ आहे; परंतु हे रूपांतरण म्हणजे समग्र चेतनेचे रूपांतरण असते; समग्र प्रकृतीचे तिच्या पायापासून ते माथ्यापर्यंतचे रूपांतरण असते, तिच्या अगदी गुप्त अशा आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य अशा बाह्यवर्ती वर्तनाच्या प्रत्येक भागाचे रूपांतरण असते. हा काही केवळ नैतिक बदल किंवा धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा […]