Entries by श्रीअरविंद

श्रीमाताजी आणि समीपता – १२

श्रीमाताजी आणि समीपता – १२ साधक : एकमेव श्रीमाताजींमध्ये विलीन होण्याची आणि प्रत्येकाशी असलेले माझे नातेसंबंध तोडण्याची माझी तयारी आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते कृपा करून मला सांगाल का? श्रीमाताजींनी मला आंतरिकरित्या आणि बाह्यतः देखील साहाय्य करावे, अशी माझी प्रार्थना आहे. श्रीअरविंद : तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे, […]

श्रीमाताजी आणि समीपता – १०

श्रीमाताजी आणि समीपता – १० व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०९

श्रीमाताजी आणि समीपता – ०९ पूर्णयोगाच्या साधनेसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अविचलता आणि शांती, विशेषतः प्राणाची (vital) शांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर किंवा आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून नसते; तर ती उच्चतर चेतनेशी, म्हणजे ईश्वरी चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर, म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर अवलंबून असते. ज्या व्यक्ती आपले मन आणि प्राण श्रीमाताजींच्या सामर्थ्याप्रत आणि […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०८

श्रीमाताजी आणि समीपता – ०८ साधक : श्रीमाताजींबरोबर असलेले कोणते नाते हे सर्वात खरे आणि सत्य असल्याचे म्हणता येईल? त्यांच्याशी असणारे आत्मत्वाचे नाते (soul relation) हेच एकमेव खरे नाते आहे, असे म्हणता येईल का? आणि आत्मत्वाचे नाते म्हणजे काय? मला ते कसे ओळखता येईल? श्रीअरविंद : आंतरिक (आत्मत्वाचे) नाते म्हणजे व्यक्तीला श्रीमाताजींच्या अस्तित्वाची जाणीव असणे. […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०७

श्रीमाताजी आणि समीपता – ०७ भौतिकदृष्ट्या ज्या व्यक्ती श्रीमाताजींच्या निकट आहेत केवळ त्याच व्यक्ती त्यांना जवळच्या आहेत असे नव्हे; तर ज्या व्यक्ती श्रीमाताजींप्रति खुल्या असतात, आंतरिक अस्तित्वातून त्यांच्याजवळ असतात, श्रीमाताजींच्या इच्छेशी एकरूप झालेल्या असतात, त्या व्यक्ती श्रीमाताजींची खरी लेकरे असतात आणि ती श्रीमाताजींना अधिक जवळची असतात. * साधक : कधीकधी मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०६

श्रीमाताजी आणि समीपता – ०६ (एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…) “श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अथवा अशा कोणत्या गोष्टीचा विचारही करू नका.” आणि येथेच, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या प्राणाकडून जी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा ‘किरकोळ गोष्टी’ श्रीमाताजींच्या नजरेस कशा […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०५

श्रीमाताजी आणि समीपता – ०५ (एका साधिकेला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…) “श्रीमाताजी इतर सर्वांची त्यांच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात आणि फक्त माझीच त्यांना काळजी नाही,” हा तुमचा स्वतःबद्दलचा विचार ही स्पष्टपणे एक निराधार कल्पना आहे आणि त्याला कोणताही ठोस आधार नाही. त्या इतरांवर जेवढे प्रेम करतात तेवढेच प्रेम त्या तुमच्यावरही करतात, त्या इतरांची जशी आणि […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०३

श्रीमाताजी आणि समीपता – ०३ साधक : प्रत्येकाला जे काही आवश्यक असते ते श्रीमाताजी त्याला देत असतात. एखाद्या व्यक्तीला अमुक एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती स्वीकारण्याची त्याची क्षमतादेखील आहे अशा व्यक्तीला श्रीमाताजी त्या गोष्टीपासून कधीही वंचित ठेवत नाहीत. आम्ही मात्र असे आहोत की त्या जे देतात, ते ग्रहण करण्याची आमची तयारी नसते. श्रीअरविंद : […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०२

श्रीमाताजी आणि समीपता – ०२ साधक : श्रीमाताजींबरोबरचे आमचे खरे नाते कोणते? माता आणि बालक हेच नाते खरे ना? श्रीअरविंद : एखादे बालक मातेवर ज्याप्रमाणे संपूर्णतया, प्रामाणिकपणे आणि साध्यासुध्या विश्वासाने, प्रेमाने विसंबून असते तेच नाते हे श्रीमाताजींबरोबर असलेले खरे नाते होय. * तुम्ही श्रीमाताजींचे बालक आहात आणि मातेचे तिच्या बालकांवर अतोनात प्रेम असते आणि त्यांच्या […]

भव्य आणि गौरवशाली रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – ३१२ भव्य आणि गौरवशाली रूपांतरण मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक बंदिस्त जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या ‘दिव्य कारागीरा’कडून ‘अतिमानवता’ घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे. […]