Entries by श्रीअरविंद

परिपूर्ण रूपांतरण

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व […]

परिसरीय चेतना आणि अवचेतन

साधना, योग आणि रूपांतरण – २९० अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते. जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा […]

स्वप्ने आणि अवचेतनाची शुद्धी

साधना, योग आणि रूपांतरण – २८९ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण (श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते म्हणजे खरंतर, तुमच्या (subconscient) अवचेतनामधून वर आलेल्या गतकालीन रचना होत्या किंवा त्यांचे ठसे होते. आपण जीवनामध्ये जे जे काही करतो, आपल्याला जे जाणवते किंवा ज्याचा आपण अनुभव घेतो, त्या सगळ्यांचा काही एक […]

शारीर-चेतनेचा गुप्त आधार

साधना, योग आणि रूपांतरण – २८८ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण (श्रीअरविंद आणि श्रीमाताजी अवचेतनावर कार्य करत होते. त्याचा संदर्भ येथे आहे.) अवचेतनामधील (subconscient) साधनेचे हे कार्य व्यक्तिगत स्वरूपाचे नसून, ते सार्वत्रिक स्वरूपाचे असते. पण निश्चितच त्याचा येथील (श्रीअरविंद-आश्रमातील) प्रत्येकावर काही ना काही प्रमाणात परिणाम होत आहे. अवचेतनामध्ये चेतना व प्रकाश उतरविला नाही तर त्यामध्ये […]

साधनेमधील अवचेतनाचा अडथळा

साधना, योग आणि रूपांतरण – २८७ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण आंतरिक अस्तित्व हे अवचेतनावर (subconscient) अवलंबून नसते. परंतु बाह्यवर्ती अस्तित्व मात्र जन्मानुजन्मं अवचेतनावर अवलंबून राहत आले आहे. आणि त्यामुळे बाह्यवर्ती अस्तित्व आणि शारीर-चेतनेची अवचेतनाला प्रतिसाद देण्याची सवय, या गोष्टी साधनेच्या प्रगतीमध्ये एक भयंकर मोठा अडथळा ठरू शकतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत तो तसा अडथळा […]

अवचेतनाचा प्रांत

साधना, योग आणि रूपांतरण – २८६ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण अवचेतनाचा प्रांत (subconscient) हा अंधकारमय आणि अज्ञानमय प्रांत असतो आणि त्यामुळे तेथे प्रकृतीच्या अंधकारमय गतिप्रवृत्तींची ताकद अधिक प्रबळ असणे, हे स्वाभाविक आहे. कनिष्ठ प्राणापासून (lower vital) खाली असणाऱ्या प्रकृतीच्या इतर सर्व कनिष्ठ भागांच्या बाबतीतही हे तितकेच खरं आहे. परंतु अगदी क्वचितच, या भागाकडून चांगल्या […]

अवचेतनाचे स्वरूप

साधना, योग आणि रूपांतरण – २८५ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण आपल्या शरीरामध्ये उच्चतर चेतना जेथून उतरते, तो अतिचेतनाचा (superconscient) प्रांत आपल्या डोक्याच्या वर (आपल्या वर्तमान चेतनेच्या वर) असतो, त्याचप्रमाणे (आपल्या वर्तमान चेतनेच्या खाली) आपल्या पावलांच्या खाली अवचेतनाचा (subconscient) प्रांत असतो. जडभौतिकाची (Matter) निर्मिती ही अवचेतनामधून झालेली असल्यामुळे, जडभौतिक हे या शक्तीच्या नियंत्रणाखाली असते. आणि […]

पायाभूत स्थिरीकरण

साधना, योग आणि रूपांतरण – २८१ शरीराचे रूपांतरण तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या शारीरिक अस्तित्वामध्ये (physical being) तुम्ही संपूर्ण खुलेपणा प्रस्थापित केला पाहिजे. आणि त्यामध्ये शांत-स्थिरता, सामर्थ्य, विशुद्धता आणि हर्ष यांचे अवतरण स्थिर केले पाहिजे. तसेच त्याबरोबरच तुमच्यामधील श्रीमाताजींच्या ‘शक्ती’च्या उपस्थितीची आणि कार्याची जाणीवसुद्धा स्थिर केली पाहिजे. या खात्रीशीर […]

आवश्यक असणारे परिवर्तन

साधना, योग आणि रूपांतरण – २८० शरीराचे रूपांतरण (शरीराच्या एखाद्या भागाचे) रूपांतरण घडविताना, अडचणींना सामोरे जाणे आणि व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये जे काही उद्भवते त्याच्यावर मात करणे किंवा त्यामध्ये परिवर्तन करणे अध्याहृत असते; जेणेकरून तो भाग, उच्चतर गोष्टींना प्रतिसाद देऊ शकेल. परंतु समग्र व्यक्तित्वामध्ये संपूर्ण परिवर्तन हे ‘ऊर्ध्वस्थित’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत केलेल्या आरोहणाद्वारे आणि ‘ईश्वरा’च्या अवतरणाद्वारे शक्य […]

कनिष्ठ शारीर-प्रकृतीवर कार्य

साधना, योग आणि रूपांतरण – २७९ शरीराचे रूपांतरण (श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…) साधनेच्या वाटचालीदरम्यान आता तुमची चेतना ही कनिष्ठ शारीर-प्रकृतीच्या (lower physical nature) संपर्कामध्ये आली आहे. आणि मनाद्वारे, किंवा अंतरात्म्याद्वारे किंवा आध्यात्मिक शक्तीद्वारे नियंत्रित केलेली नसताना ती जशी असते तशीच ती तुम्ही पाहत आहात. ही प्रकृती मुळातच कनिष्ठ आणि अंधकारमय इच्छावासनांनी भरलेली असते. मानवाचा […]