Entries by श्रीअरविंद

जीवन जगण्याचे शास्त्र – १८

जीवन जगण्याचे शास्त्र – १८ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) जे मन अस्वस्थतेपासून, त्रासापासून मुक्त आहे; जे स्थिर, प्रकाशमान, आनंदी आणि उत्साही आहे; परिणामत: जे तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या शक्तीप्रत खुले आहे, असे (अविचल) मन मला येथे अभिप्रेत आहे. त्रस्त करणारे विचार, चुकीच्या भावभावना, कल्पनांचा गोंधळ, दुख:कारक गतिप्रवृत्ती यांच्या नेहमी होणाऱ्या आक्रमणापासून सुटका करून घेणे […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १७

जीवन जगण्याचे शास्त्र – १७ तुमच्या साधनेच्या दृष्टीने कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे तुमच्या मनाला कसे काय कळू शकेल किंवा मन ते कसे ठरवू शकेल बरे? अशा प्रकारच्या विचारांमध्येच जर तुमचे मन गुंतून राहिले तर आणखीनच गोंधळ उडेल. साधनेमध्ये मन हे स्थिरशांत असले पाहिजे आणि ते ईश्वराविषयीच्या अभीप्सेवर दृढ असले पाहिजे. मन स्थिरशांत असताना, […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १६

जीवन जगण्याचे शास्त्र – १६ तुम्ही जर ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान करू शकत नसाल आणि तिच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल तर, तुम्हाला पूर्णयोग करता येणे शक्यच होणार नाही. तुम्ही जर केवळ मनामध्ये आणि मनाच्या शंकाकुशंका व कल्पना यांच्यामध्येच जीवन जगत असाल तर, तुमच्याबाबतीत पूर्णयोगाची शक्यताच निर्माण होत नाही. त्यासाठी मन शांत करण्याची क्षमता तसेच श्रीमाताजींची शक्ती […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १५

जीवन जगण्याचे शास्त्र – १५ सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे; श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करू देणे; तुम्हाला मार्गदर्शन करू देणे; तुम्हाला ज्ञान, शांती आणि आनंद प्रदान करू देणे म्हणजे श्रीमाताजींप्रति उन्मुख, खुले असणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले (open) राखू शकत नसाल तर, त्यासाठी सातत्याने पण […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १३

जीवन जगण्याचे शास्त्र – १३ माधुर्य आणि आनंदी भावना वाढीस लागू दिली पाहिजे; कारण या गोष्टी म्हणजे तुम्ही आत्म्याप्रत, चैत्य पुरुषाप्रत जागृत झाला आहात आणि तो तुमच्या संपर्कात आहे, याची सर्वात ठळक खूण असते. विचार किंवा उच्चार किंवा आचारामधील चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका; त्या बाह्य गोष्टी असल्याप्रमाणे त्यांना तुमच्यापासून दूर लोटा. ईश्वरी शक्ती आणि […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १२

जीवन जगण्याचे शास्त्र – १२ पूर्णयोगाची साधना करताना नेहमी गंभीर चेहऱ्याने वावरण्याची किंवा शांत शांत राहण्याची आवश्यकता नसते, पण योगसाधना मात्र गांभीर्याने घेणे आवश्यक असते. शांती आणि अंतर्मुख एकाग्रता या गोष्टींना या योगामध्ये फार मोठे स्थान आहे. अंतरंगात वळणे आणि तेथे ईश्वराला भेटणे हे जर व्यक्तीचे ध्येय असेल तर तिने स्वतःला सदासर्वकाळ बहिर्मुख ठेवून चालत […]

आत्मसाक्षात्कार – २८

आत्मसाक्षात्कार – २८ (मागील भागावरून पुढे…) (आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.) अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे. अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील […]

आत्मसाक्षात्कार – २७

आत्मसाक्षात्कार – २७ (मागील भागावरून पुढे…) उठा, (जागे व्हा आणि) स्वतःच्या अतीत जा, तुमचे स्वत:चे मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची समग्र प्रकृतीच अशी असते की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मानवामधील पशु-मानव (animal man) होता, तो आता त्याहूनही वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो […]

आत्मसाक्षात्कार – २६

आत्मसाक्षात्कार – २६ (मागील भागावरून पुढे…) तुम्ही आत्म्यामध्ये मुक्त व्हा आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये स्वतंत्र व्हाल. कारण चैतन्य म्हणजे स्वातंत्र्य. तुम्ही ईश्वर आणि सर्व जिवांशी एकरूप व्हा. तुम्ही तुमच्या क्षुद्र अहंकारामध्ये नव्हे तर, आत्म्यामध्ये राहून जीवन जगा. कारण चैतन्य म्हणजे एकत्व. तुम्ही मृत्युवर विश्वास ठेवू नका. ‘स्व’ बना, अमर्त्य […]

आत्मसाक्षात्कार – २५

आत्मसाक्षात्कार – २५ (मागील भागावरून पुढे…) इथे तुम्ही कोणतीही चूक करता कामा नये. कारण ही चूक म्हणजे स्वतःला न जाणणे. तीच तुमच्या सर्व दुःखांचे उगमस्थान असते आणि तुमच्या सर्व अध:पतनाचे कारण असते. तुम्हाला जो ‘मी’ आहे असे वाटते, त्या ‘मी’च्या अतीत तुम्ही गेलेच पाहिजे आणि तुम्ही ज्याला मनुष्य म्हणून ओळखता तो मनुष्य म्हणजे प्रकट ‘पुरुष’ […]