Entries by अभीप्सा मराठी मासिक

सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ०२

भौतिक संभावनांच्या वर उठून, पुरेसे उन्नत कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल तर, तिला या पार्थिव जीवनाकडे समग्रपणाने पाहता येते. त्या क्षणापासून हे लक्षात घेणे सोपे जाते की, आजवरचे मानवजातीचे सारे प्रयत्न हे एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेले आहेत. सामूहिक रीतीने असू देत वा वैयक्तिक रीतीने असू देत, माणसं तेथपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात […]

सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ०१ प्रस्तावना

जिवाला जगदीश्वराकडे जाण्याच्या मार्गामध्ये जगत् आडवे येते, अशी पूर्वी समजूत असल्याने, जगताचा त्याग करून, दूर कोठेतरी अरण्यात राहून, उपासना करण्याकडे पूर्वीच्या योगाचा कल होता. परंतु आहे त्या जीवनात राहूनच, साधना, उपासना करता येते, नव्हे, तर ती तशीच केली पाहिजे असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादन केले. जगाला आणि जीवनाला ते आत्ता आहे त्याच स्थितीत सोडून […]

कर्म आराधना – ०३

कर्म आराधना – ०३ हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ ‘तू’च व्हावे यासाठी दिवसातील प्रत्येक क्षणाला मी ‘तुला’ आवाहन करते. या देहाद्वारे ‘तुझी’ सेवा घडू दे, ते तुझे साधन (Instrument) असल्याची जाणीव त्याला होऊ दे आणि माझी सर्व चेतना ‘तुझ्या’ चेतनेमध्ये विलीन होऊ दे. आणि त्या चेतनेद्वारे, ‘तुझ्या’ […]

कर्म आराधना – ०२

कर्म आराधना – ०२ (जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी…) सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ तुझा जयजयकार असो. असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट ‘तुझ्या’ कार्यात अडसर ठरू नये. असे वरदान दे की, कशामुळेही ‘तुझ्या’ आविष्करणामध्ये विलंब होऊ नये. असे वरदान दे की, सर्व गोष्टींमध्ये […]

कर्म आराधना – ०१

कर्म आराधना – ०१ प्रस्तावना श्रीअरविंदांच्या पूर्णयोगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कर्म’. पूर्णयोगामध्ये मानवतेची सेवा करण्यावर किंवा कोणत्यातरी विशिष्ट मानसिक आदर्शानुसार सेवा करण्यावर भर नसून, ईश्वराची सेवा करण्यावर भर आहे. मानवतेची सेवा केल्याने व्यक्ती व्यापक होऊ शकते खरी परंतु, बरेचदा तीच सेवा, आपण इतरांचे कल्याण करत आहोत याची प्रौढी मिरविणाऱ्या राजसिक अहंकारावर पांघरूण घालते. फारफार […]

कृतज्ञता – प्रस्तावना

कृतज्ञता – ०१ योगमार्गामध्ये कृतज्ञतेद्वारे चेतनेची एक विशिष्ट अवस्था अभिव्यक्त होते, त्यामध्ये समर्पण व विश्वास या भावनेतून ईश्वराभिमुख होणे असते; ईश्वराकडून ज्या कोणत्या आंतरिक व बाह्य भेटवस्तू मिळतात त्यांचा आनंदाने स्वीकार असतो. किंबहुना, कृतज्ञतेच्या या अवस्थेमध्ये व्यक्ती जीवनातील प्रत्येक घटनाच ईश्वरी कृपेची देणगी आहे, आशीर्वाद आहे, या भूमिकेतून स्वीकारते. कृतज्ञता म्हणजे काय, ती व्यक्तींबाबत बाळगायची […]

महायोगी श्रीअरविंद – १९

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ‘प्रकृती’ ही उत्क्रांतीच्या माध्यमातून एक प्रकारे योगच करत आहे. या योगप्रवासामध्ये जडसृष्टी, प्राण, मन यांच्या विकसनानंतर, आता एका नवीन उत्क्रांती-टप्प्याकडे तिच्या विकसनाची वाटचाल चालू आहे. अधिमानस, अतिमानव, आणि अतिमानसिक जीव या मार्गाने ती वाटचाल करत आहे, असे श्रीअरविंद यांनी स्पष्ट केले आहे. आजवरच्या वाटचालीमध्ये प्रकृती एकाकी रीतीने हे कार्य […]

महायोगी श्रीअरविंद – १८

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंदांचे प्रतीक : अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा ही ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोणांच्या संधीस्थानी असलेला मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. […]

महायोगी श्रीअरविंद – १७

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंदांचा देह समाधिस्थ करण्यात आल्यानंतर, दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी श्रीमाताजींनी पुढील संदेश दिला. हा संदेश श्रीअरविंदांच्या समाधीवर संगमवरामध्ये कोरण्यात आला आहे. “आमच्या प्रभूचे भौतिक आवरण असणाऱ्या हे देहा, तुझ्याप्रत आमची अनंत कृतज्ञता!! ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःखभोग सहन केले, ज्याने […]

महायोगी श्रीअरविंद – १६

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ दि. ०७ डिसेंबरला श्रीमाताजींनी लिहिले आहे – “हे प्रभू, तुमचे कार्य जोवर साध्य होत नाही तोवर तुम्ही आमच्या सोबत असाल, मार्गदर्शन आणि प्रबोधन करणारी केवळ चेतना म्हणूनच नव्हे तर, कृतीमधील गतिशील ‘उपस्थिती’ म्हणूनदेखील तुम्ही आमच्या सोबत असाल, असा विश्वास तुम्ही मला आज सकाळी दिला आहे. जोवर पृथ्वीचे रूपांतरण होत […]