Entries by अभीप्सा मराठी मासिक

सद्भावना – प्रस्तावना

सद्भावना – ०१ पूर्णयोगाच्या आव्हानात्मक मार्गावर पुढे किंवा वर आपण जसजसे प्रगत होत जातो, तसतशा प्रत्येक टप्प्यावर आपल्याकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. – प्रामाणिकपणा, विनम्रता, समता, अभीप्सा, नकार, समर्पण… अशांपैकीच एक गोष्ट म्हणजे सद्भावना. परंतु ‘सद्भावना’ या शब्दाचा खरा अर्थ काय? आपल्या साधनेमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये त्याचे नेमके स्थान कोणते? हा असा एक शब्द आहे […]

एकाग्रतेची दोन केंद्रे

विचार शलाका – ४० प्रश्न : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची? श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त […]

योग्य काळाची वाट पाहा.

विचार शलाका – ३९ (श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा कळेल की, ‘देव’च तुमचा गुरु आहे. योगाची स्वाभाविक प्रक्रिया घडून यावी म्हणून, अनंत प्रज्ञेने तुमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान आंतरिक आणि बाह्य परिस्थिती कशी सूक्ष्मपणाने नियोजित केली आहे, त्याची कशी अंमलबजावणी केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आंतरिक व बाह्य प्रवृत्तींना […]

श्रीअरविंद यांच्याशी झालेली पहिली भेट.

इसवी सन १९१४. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या नियतकालिकामध्ये, पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या श्री. अरविंद घोष यांच्या ‘आर्य’ मासिकाविषयीचे निवेदन आले होते, आणि ते निवेदन तेव्हा नवयुवक असलेल्या अंबालाल पुराणी यांच्या वाचनात आले. त्यांनी त्याची वर्गणी भरली. तत्पूर्वी बडोद्याच्या ‘दांडिया बाजार’ येथे झालेली लोकाग्रणी असलेल्या श्री. अरविंद घोष यांची व्याख्याने त्यांनी ऐकलेली होती. पुराणी तत्कालीन स्वातंत्र्यचळवळीत सहभागी […]

ईश्वरी कृपा – प्रस्तावना

अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये असताना व्यक्तीला देवाची आठवण होते, अशी व्यक्ती देवाचा धावा करते, त्या परिस्थितीमधून सोडवावे म्हणून त्याची प्रार्थना करते, ‘ईश्वरी कृपा’ व्हावी अशी तिला आस असते. आणि कधीकधी ‘ईश्वरी कृपा’ घडूनही येते. पण ती केव्हा झाली, कशी झाली, कृपा झाली म्हणजे नेमके काय झाले, व्यक्तीने अशा वेळी काय करायला हवे, तिचा दृष्टिकोन कसा असावा? किंवा […]

अमर्त्यत्वाचा शोध ४०

गेले काही दिवस आपण अमर्त्यत्व, शरीराचे रूपांतरण, अतिमानस यासंबंधीचे तत्त्वज्ञान समजावून घेतले. आपण पाहिले की, अतिमानसिक देहाच्या चार वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे दीप्तिमानता (luminosity). अशा देहाचे विवेचन करताना श्रीमाताजींनी म्हटले आहे की, ”अंततः तो देह दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ […]

अमर्त्यत्वाचा शोध २०

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०४ …ज्या व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये जीवन जगतात आणि भावनांना स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण करू देतात अशा भावनाशील व्यक्तींबाबत मात्र ही (तर्कबुद्धीची) पद्धत तितकीशी उपयुक्त ठरू शकत नाही. निःसंशयपणे अशा व्यक्तींनी दुसऱ्या मार्गाचा म्हणजे आंतरिक शोधाच्या पद्धतीचा आश्रय घ्यायला हवा. सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश […]

अमर्त्यत्वाचा शोध – प्रस्तावना

सामान्य माणूस मृत्युच्या नुसत्या कल्पनेनेच भयभीत झालेला असतो. शास्त्रज्ञ मंडळी मृत्युवर मात करण्यासाठी संशोधन करत असतात. संत मंडळी आपल्याला ‘मरणाचे स्मरण असावे’ असे सांगतात. गूढवाद्यांना मृत्यू व त्यानंतरचे जीवन खुणावत राहते. तर अध्यात्ममार्गावर ज्यांची वाटचाल चालू झालेली असते त्यांच्यापैकी काहीजणांची जन्म-मृत्युच्या कोड्याची उकल व्हावी म्हणून धडपड सुरू असते. काहीही असले तरी, सर्वांनाच आपले जीवन अखंडित […]

,

सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आणि साधना

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १४ योगमार्ग अनेक आहेत, आध्यात्मिक साधना अनेक आहेत, मुक्ती आणि पूर्णत्वाप्रत घेऊन जाणारे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे ईश्वराभिमुख असणारे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे स्वतंत्र ध्येय आहे, त्या ‘एकमेवाद्वितीय सत्या’बाबतचे प्रत्येकाचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन आहेत, प्रत्येकाच्या स्वतंत्र पद्धती आहेत, प्रत्येकास साहाय्यभूत असे त्यांचे तत्त्वज्ञान आणि साधनापद्धती आहे. पूर्णयोग (Integral Yoga) या साऱ्या पद्धतींचे […]

समर्पण आणि विरोधी शक्तींचा सामना

समर्पण – ०६ हृदयामध्ये ईश्वराद्वारे मला सतत मार्गदर्शन मिळत आहे अशी एखाद्या व्यक्तीची समजूत असणे, हे काही अनिवार्यपणे समर्पणच असते असे नाही. समर्पण असण्यासाठी व्यक्तीने निःसंग असले पाहिजे आणि दिव्य शक्ती कोणत्या व अदिव्य शक्ती कोणत्या ते ओळखून, व्यक्तीने अदिव्य शक्तींना नकार दिला पाहिजे. अशा प्रकारे विवेक बाळगल्यानेच व्यक्ती हृदयस्थ ईश्वराप्रत खरेखुरे समर्पण करू शकते. […]