अरविंद घोष – ०९
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनीदेवी यांच्याशी झाला. परदेशगमन करून आलेल्या अरविंदांचे, तत्कालीन प्रथेनुसार शुद्धीकरण करण्याचा प्रसंग समोर उभा ठाकला, प्रागतिक विचारसरणीच्या अरविंदांनी त्याला साफ नकार दिला. कलकत्ता येथे संपन्न झालेल्या या विवाहप्रसंगी सर जगदीशचंद्र बोस सपत्निक उपस्थित होते. अरविंद घोष […]





